हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

Updated:May 28, 2025 16:56 IST2025-05-28T13:28:37+5:302025-05-28T16:56:35+5:30

High Blood Pressure : जर हाय ब्लड प्रेशरवर सुरूवातीलाच ओळखून उपचार केले गेले तर पुढे त्रास कमी होतो. काही नॅचरल गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकता.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर ही आजकाल वाढत चाललेली एक गंभीर समस्या आहे. आधी फक्त जास्त वयात होणारी ही समस्या अलिकडे कमी वयाच्या लोकांमध्येही बघायला मिळत आहे. कारण चुकीची लाइफस्टाईल, अनहेल्दी आहार, बिघडलेलं रूटीन आणि अधिक तणाव. हाय ब्लड प्रेशरला हायपरटेंशनही म्हटलं जातं. जर एकदा ही समस्या झाली तर आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागतो. पण जर हाय ब्लड प्रेशरवर सुरूवातीलाच ओळखून उपचार केले गेले तर पुढे त्रास कमी होतो. काही नॅचरल गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकता.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी नियमितपणे फळं खाल्ली पाहिजेत. बरेच फळं आपलं शरीर फिट ठेवतात, सोबतच हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करतात. फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे बीपीची समस्या कमी करतात.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

2020 मध्ये कॅम्ब्रिज यूनिव्हर्सिटी, रीडिंग यूनिव्हर्सिटी आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेविस अॅन्ड मार्स यांनी मिळून एक अभ्यास केला होता. या रिसर्चमधून समोर आलं की, हाय ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी सफरचंद, द्राक्षासारखी फळं खूप फायदेशीर ठरतात. रीडिंग यूनिव्हर्सिटीच्या न्यूट्रिशनिस्ट गुंटूर कुन्ह्ले यांच्यानुसा, हा असा पहिला शोध आहे ज्यात आरोग्य आणि एखाद्या खास न्यूट्रिएंटमध्ये संबंध सांगण्यात आला.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

हाय ब्लड प्रेशर झाल्यावर रोज किमान दोन सफरचंद खायचे असतात. सफरचंद खाल्ल्यानं लघवी जास्त आणि लवकर येते, ज्यामुळे शरीरात जमा झालेलं जास्त सोडिअम बाहेर पडतं. शरीरात मीठ कमी झालं तर ब्लड प्रेशरही हळूहळू कंट्रोल होतं. सोबतच आपल्या किडनीवरही कमी दबाव पडतो.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

आपल्या शरीरात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि प्रोऑक्सीडेंट दोन्ही असतात जर प्रोऑक्सीडेंट जास्त झालेत तर गंभीर आजारांचा धोका वाढतो. लाल किंवा काळ्या द्राक्ष्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात, जे आजारांसोबत लढण्यास सेल्सची मदत करतात. त्यामुळे द्राक्ष खाणं फायदेशीर ठरतं. यानं हृदय मजबूत होतं आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

लिंबाचा रस रोज प्यायल्यास रक्तवाहिन्या लवचिक होतात आणि त्यात जमा कोलेस्टेरॉलही बाहेर पडतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. अशात हृदयरोद आणि हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो. ब्लड प्रेशर जास्त असो वा कमी लिंबू पाणी पिऊन तुम्ही खूप फायदे मिळवू शकता. खासकरून कोमट लिंबू पिळून प्याल तर अधिक फायदा मिळेल.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी रोज संत्री खाणं सुद्धा खूप फायदेशीरशी ठरतं. तसेच रोज उपापोटी संत्र्याचा ज्यूस प्यायल्यानंही फायदा मिळतो. यात पोटॅशिअम आणि कॅल्शिअम असतं. जे ब्लड प्रेशर कंट्रोल करतात. तसेच यात व्हिटामिन सी सुद्धा भरपूर असतं आणि यानं इम्यूनिटी बूस्ट होते.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

केळ्यात पोटॅशिअम जास्त आणि सोडिअम कमी असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. अमेरिकेतील फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, रोज केळी खाल्ल्यानं हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो. केळी आरोग्य ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट मानली जातात.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी ६ फळं, रोज खा- रक्तदाबासह ‘हे’ आजारही राहतात लांब

हाय ब्लड प्रेशरमध्ये पपई खाणं खूप फायदेशीर ठरतं. जर रोज उपाशीपोटी साधारण 250 ग्रॅम पपई दोन ते तीन महिने खाल तर ब्लड प्रेशर कमी होईल. पपई हलकं, पचनास सोपं असं फळ आहे. यानं हृदय सुद्धा मजबूत राहतं.