वाळून गेलेल्या रोपालाही ८ दिवसांतच फुटतील नवी पानं! रोपांना हिरवंगार करणारं द्या 'हे' खास टॉनिक
Updated:June 13, 2025 18:37 IST2025-06-13T15:43:43+5:302025-06-13T18:37:22+5:30

बागेतल्या रोपांची आपण कितीही काळजी घेतली तरी असं बऱ्याचदा असं होतंच की एखादं रोप अगदी सुकून जातं.(what to do if plant is dying?)
सुरुवातीला त्याची पानं पिवळी पडून गळू लागतात (How To Revive A Dying Plant?). नंतर त्याला नविन पानं फुटणं बंद होतं आणि हळूहळू ते रोप पुर्णपणे सुकून जातं.(best home hacks for Revive A Dying Plant)
अशा सुकून, वाळून गेलेल्या रोपाला पुन्हा एकदा हिरवंगार, टवटवीत करायचं असेल तर त्याला हे खास टॉनिक एकदा द्या.. काही दिवसांपुर्वी हेच रोप सुकून, वाळून गेलेलं होतं यावर तुमचाच विश्वास बसणार नाही.
हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये १ चमचाभर तांदूळ ८ ते १० तास भिजत घाला. यानंतर हे पाणी गाळून घ्या.
आता गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोड्यामुळे रोपावर कोणता रोग पडला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते.
आता त्याच पाण्यात १ चमचा व्हाईट व्हिनेगर घाला आणि पाणी ३ ते ४ तासांसाठी झाकून ठेवा.
हे पाणी जे रोप पुर्णपणे वाळून, सुकून गेलं आहे त्या रोपावर शिंपडा तसेच त्याच्या कुंडीतल्या मातीतही घाला.
काही दिवसांतच हे रोप छान फुलून येईल आणि हिरवंगार होईल. ट्राय करून पाहा.