Join us

तुळशीच्या मंजिरी काढण्याची योग्य पद्धत कोणती? रोप बहरण्यासाठी खास ट्रिक्स- तुळस वाढेल भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 17:25 IST

1 / 7
हिंदू धर्मात तुळशीला धार्मिक महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगणात तुळशीचे रोप असते. पण बदलत्या ऋतूचा जसा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तसेच रोपांवर देखील होतो. ज्यामुळे तुळशीचे रोप कोमजते, बहर येत नाही, पाने पिवळी पडतात. (Tulsi Manjiri plucking method)
2 / 7
अनेकदा तुळशीची पाने गळतात, पण रोपाला मंजिरी दिसते. किंवा नुसतं काठ्या दिसतात. कधीकधी तुळशीचे रोप लवकर सुकू लागते. वेळेवर पाणी किंवा खत न दिल्यास किंवा मंजिरी न काढल्यास रोपाच्या वाढीवर परिणाम होतो. (Tulsi plant care: How to grow Tulsi faster)
3 / 7
तुळशीचे झाड जसजसे मोठे आणि दाट होते तसतसे त्याला मंजिरी येऊ लागतात. पण या मंजिरी काढल्या नाहीतर रोपाची वाढ थांबू शकते. त्यासाठी ते या बिया काढणं महत्त्वाच्या आहे.
4 / 7
यासाठी आपण तुळशीच्या मंजिरी सुरी किंवा कैचीच्या मदतीने काढू शकतो. जर आपल्याला कापायचे नसेल तर हाताच्या सहाय्याने काढा.
5 / 7
या मंजिरी इतर कुंड्यांमध्ये घालू शकता. ज्यामुळे नवीन तुळस येण्यास मदत होईल. किंवा देवाला वाहता येतील, नंतर त्या वाहत्या पाण्यात सोडू शकता.
6 / 7
कधीकधी तुळशीचे झाड फक्त काही फांद्या असतानाच उंच वाढू लागते. अशा परिस्थितीत आपण रोपाची छाटणी करत राहायला हवी. ज्यामुळे रोपाला पालवी फुटेल आणि ते बहरण्यास मदत होईल.
7 / 7
तुळशीचे रोप हिरवेगार ठेवण्यासाठी दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी त्यात चहाच्या पानांचे पाणी घाला. किंवा इतर खते घातल राहा. माती देखील तपासत राहा. झाडाला जास्त पाणी टाकल्यास ते सुकते किंवा मरते. त्यामुळे थोडे थोडे पाणीच घालावे.
टॅग्स : बागकाम टिप्स