किचनमधला बेकिंग सोडा फुलझाडांसाठी अमृतच.. 'या' पद्धतीने रोपांना द्या, फुलांनी बहरतील रोपं
Updated:September 18, 2025 12:54 IST2025-09-18T09:30:10+5:302025-09-18T12:54:45+5:30

इडली, ढोकळा, केक यासारखे पदार्थ उत्तम जमावे म्हणून आपण त्यांच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा नक्कीच घालतो.(use of baking soda for flowering plants)
स्वयंपाकात उपयोगी ठरणारा बेकिंग साेडा स्वच्छतेच्या कामीही खूप उपयोगी येतो.(how to use baking soda for getting maximum flowers?)
आता हाच बेकिंग सोडा तुमची बाग फुलविण्यासाठीही कशी मदत करतो ते पाहूया.. जर तुमच्या घरच्या फुलझाडांना फुलंच येत नसतील, तर बेकिंग साेड्याचे पुढे सांगितलेले काही उपाय नक्की करून पाहा. यामुळे रोपांची चांगली वाढ होऊन भरपूर फुलं येतील.
५ ग्रॅम बेकिंग सोडा अर्धा लीटर पाण्यात मिसळा आणि हे पाणी रोपांवर शिंपडा. यामुळे रोपांची पानं हिरवीगार होऊन राेपांना कळ्याही लागतील.
५ ग्रॅम बेकिंग सोडा अर्धा लीटर पाण्यात मिसळा आणि त्यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब टाका. हे पाणी कुंडीतल्या मातीमध्ये घाला. जमिनीची पीएच लेव्हल चांगली होऊन रोपांची चांगली वाढ होईल.
५ ग्रॅम बेकिंग सोडा, १ चमचा साखर हे दोन्ही पदार्थ १ ग्लास पाण्यामध्ये मिसळा आणि हे पाणी रोपांना द्या. फुलझाडांवर कोणता रोग पडलेला असल्यास तो निघून जाईल आणि फुलंही छान टपोरी येतील.