फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

Updated:March 3, 2026 09:35 IST2026-03-03T09:32:29+5:302026-03-03T09:35:01+5:30

फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

फुलझाडांची आवड असेल तर उन्हाळ्यात किंवा खरंतर उन्हाळ्याच्या आधीच ही काही रोपं तुमच्या बागेत लावायलाच हवीत (summer special flowering plants). कारण या रोपांसाठी उन्हाळा हा उत्तम सिझन असून त्यांची खूप छान वाढ होते आणि भरपूर फुलंही येतात.(5 flowering plants that blooms in summer)

फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

त्यापैकी पहिलं रोप आहे मोगरा. मोगऱ्याचा मंद सुगंध अंगणात, घरात दरवळू लागला की मन कसं फ्रेश होऊन जातं. सगळा थकवा गळून जातो.(flowering plants that easily grows in summer)

फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

मधुमालती हे देखील एक अतिशय सुंदर सुवासिक फुल. याचा वेल या दिवसांत नक्की गॅलरीमध्ये, अंगणात, गेटवर चढवा. पांढरट, गुलाबी फुलं पाहूनच छान वाटेल.

फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

मोगऱ्यासारखाच सुगंध असणारं पण अतिशय नाजुक असणारं दुसरं एक रोप म्हणजे मधुकामिनी. ही फुलं रात्री फुलतात आणि आजुबाजुचं वातावरण प्रसन्न करून टाकतात.

फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

रातराणीचं रोपही या दिवसांत नक्की लावा. रातराणीच्या फुलाचा सुगंधही अतिशय मुग्ध करणारा असतो. १० ते १२ इंच आकाराच्या कुंडीत तुम्ही रातराणी लावू शकता.

फुलझाडं आवडतात? मग उन्हाळ्यात लावायलाच हवीत 'ही' रोपं, रंगबिरंगी फुलं पाहून वाटेल प्रसन्न

बोगन वेलीलाही या दिवसांत खूप फुलं येतात. पण त्याला सुगंध मात्र नसतो. पण तरीही वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी घराच्या आजुबाजुचा परिसर फुलवून टाकायचा असेल तर बोगन वेल अवश्य लावा.