Join us

उन्हाळ्यात कुंडीतील रोपं सुकतात-कोमजतात? मातीत घाला 'ही' घरगुती खतं, रोपांना येईल नव्याने बहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 09:05 IST

1 / 7
उन्हाळ्यात आपल्याला झाडाची सगळ्यात जास्त निगा घ्यावी लागते. या काळात कडक उन्हामुळे झाडांची माती सुकते. उष्णतेमुळे झाडांची पाने जळू लागतात. (Why do potted plants wilt in hot weather)
2 / 7
उन्हाळ्यात झाडांना पुरेशा प्रमाणात पाण्याची आणि खतं आवश्यक असतात. त्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थ कुंडीत घातल्यास रोपांना नैसर्गिक पद्धतीने खत मिळेल. तसेच रोप वाढण्यास मदत होईल. (Prevent plants from drying up in heat)
3 / 7
उन्हाळ्यात झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशावेळी त्यांना सकाळी आणि संध्याकाळी पाणी घाला. दुपारी पाणी घातल्याने रोपांच्या मुळांमध्ये वाफ तयार होते. ज्यामुळे झाडे कोमजतात.
4 / 7
रोपांना हिरवेगार ठेवण्यासाठी आणि किटकनाशकांपासून वाचवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. हे एक नैसर्गिक किटकनाशक स्प्रे आहे. ३ लिटर पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घाला आणि रोज झाडांना स्प्रे करा.
5 / 7
उन्हाळ्यात झाडांना कीड लागते. अशावेळी आपण लसणाचा वापर करु शकतो. यासाठी लसणाच्या पाकळ्यांना ३० मिनिटे गरम पाण्यात भिजवा. यात पाणी मिसळून त्याचा स्प्रे तयार करा. नियमितपणे रोपांवर स्प्रे करा.
6 / 7
उन्हामुळे झाडे सुकतात. अशावेळी नैसर्गिक खत म्हणून आपण झाडांमध्ये तांदळाचे पाणी घालू शकतो. त्यासाठी तांदळाला गरम पाण्यात भिजवून त्यात एक चमचा सोडा आणि पांढरा व्हिनेगर घाला. या पाण्याला आपण रोपांना घालून शकतो.
7 / 7
दालचिनीचा पावडर हा रोपांना वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे. हे आपल्या रोपांच्या मुळांना अधिक मजबूत बनवते. जर आपण नवीन झाड लावणार असू तर त्यामध्ये दालचिनीचा पावडर घालायला विसरु नका.
टॅग्स : बागकाम टिप्स