खतं, पाणी वेळेवर देऊनही रोपांना फुलंच येत नाही ? ५ गार्डनिंग ट्रिक्स - रोपाला येईल फुलांचा बहर...
Updated:October 1, 2025 10:35 IST2025-10-01T10:13:53+5:302025-10-01T10:35:59+5:30
reveals solution flowering problem plants : how to make plants flower faster : home remedies for flowering plants : घराच्या बाल्कनीतील फुलझाडांना खत, पाणी वेळेवर देऊनसुद्धा फुलं येतच नाहीत,मग ५ टिप्स लक्षात ठेवा...

आपल्या घराच्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण मोठ्या (reveals solution flowering problem plants) हौसेने रोप आणि फुलझाडं लावतो. या रोपांची आपण खूप काळजी घेतो, वेळेवर खतं, पाणी घालतो आणि यासोबतच रोपांना फुलं येण्याची मोठ्या आतुरतेने वाट पहातो. पण अनेकदा असं होतं की रोपांची वाढ तर चांगली होते, पण त्यांना हवी तशी भरपूर फुलं (Flowering) येत नाहीत, किंवा आलेली फुलं लवकर गळून पडतात. यामुळे हिरमोड होतो.
घराच्या गच्चीत किंवा बागेत रोपं आणि फुलझाडं लावल्यावर त्यांना (how to make plants flower faster) फुलं यावीत अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण कित्येक वेळा रोपं भरभरून वाढतात, मात्र त्यांना फुलं उमलतच नाहीत. परंतु काळजी करू नका! रोपांना फुलं न येण्यामागे माती, सूर्यप्रकाश किंवा पोषणाची कमतरता यांसारखी काही साधी कारणे असू शकतात.
अशावेळी थोडीशी काळजी आणि काही सोप्या उपायांनी (home remedies for flowering plants) झाडांना भरपूर फुलं आणता येतात. फुलझाडांना भरपूर फुलं येण्यासाठी आणि तुमच्या बागेला टवटवीत बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या ५ खास टिप्स पाहूयात.
१. बरेचदा आपण कुंडीतील रोपांसाठीच्या मातीची योग्य व अचूक निवड करत नाही. रोपांसाठी मातीची तयारी करण्यातच पहिली सर्वात मोठी चूक होते. माती नेहमी भुसभुशीत आणि पोषकतत्वयुक्त असावी. यासाठी मातीमध्ये शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट मिसळणे गरजेचे असते. हे खत रोपांच्या मुळांना ताकद देते आणि फुलं येण्यास मदत करते.
२. अनेकदा आपण रोपांना गरजेपेक्षा जास्त पाणी देतो, ज्यामुळे मूळ कुजतात आणि खराब होतात. रोपांना तेव्हाच पाणी दिले पाहिजे, जेव्हा मातीचा वरचा थर संपूर्णपणे कोरडा झालेला असेल. कुंड्यांमध्ये पाण्याची योग्य निचरा होईल अशी व्यवस्था असायला हवी, जेणेकरून रोप निरोगी राहील आणि त्यांना भरपूर फुलं येतील.
३. बहुतेक फुलझाडांना रोज कमीतकमी ५ ते ६ तास सूर्यप्रकाशाची गरज असते. जर रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर त्यावर फुलं फुलणार नाहीत. त्यामुळे कुंड्या अशा ठिकाणी ठेवल्या पाहिजेत जिथे पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचू शकेल.
४. रोपांची छाटणी आणि स्वच्छता करणे देखील तितकेच गरजेचे असते. वेळोवेळी रोपांची सुकलेली आणि पिवळी पडलेली पाने काढणे गरजेचे असते. हलकी छाटणी केल्याने रोपाला नवीन फांद्या येतात. यामुळे फुलं येण्याची शक्यता अधिक वाढते.
५. रोपांना महिन्यातून एकदा खत घालावे. खत घातल्यानंतर, रोपांना पोषण व्यवस्थित शोषता यावे यासाठी हलक्या पाण्याची फवारणी करावी. यामुळे खतं रोपाला व्यवस्थित मिळून रोपाची वाढ होऊन त्याला फुल येतात.