गुलाबाचं रोप वाढलं पण फुलांचा पत्ता नाही? मातीत ‘हे’ घरगुती खत मिसळा, गुलाबांनी बहरेल झाड
Updated:September 10, 2025 18:03 IST2025-09-10T15:23:34+5:302025-09-10T18:03:05+5:30
How To Rose Plants To Bloom At Home : या रोपांमध्ये काही घरगुती खतं घालून तुम्ही सुंदर कळ्या फुलवू शकता.

गुलाबाची सुंदर, मनमोहक फुलं सर्वांनाच आवडतात. तुम्ही आपल्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये गुलाबाचे रोप लावणार असाल किंवा आधीच हे रोप तुमच्याकडे असेल तर या रोपाला फुलं येण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Rose Plants To Bloom At Home).
मातीत पोषक तत्वांची कमतरता असेल तर फुलं यायला त्रास होतो. या रोपांमध्ये काही घरगुती खतं घालून तुम्ही सुंदर कळ्या फुलवू शकता. (5 Best Organic Fertilizer For Rose Plants To Bloom)
1) केळीचे साल
जर तुम्ही केळीचे साल कचऱ्यात फेकत असाल तर ही चूक करू नका. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात साली छोट्या चिरून घाला आणि २ दिवस झाकून ठेवा. नंतर हे पाणी गुलाबाच्या रोपाला द्या. काही दिवसातंच गुलाबांची वाढ होईल.(5 Best Organic Fertilizer For Rose Plants)
2) गायीचे शेण
गाईचे शेण हे एक उत्तम घरगुती खाद्य आहे. सकाळच्या वेळेस गुलाबाची माती खणून थोडावेळ ऊन लागू द्या. नंतर खड्ड्यात मुठभर माती घालून शेण टाका आणि रोज सकाळी पाणी घाला. या पद्धतीनं रोपांना पोषण मिळण्यास मदत होईल आणि फुलं येतील.
3) तुरटी
एका भांड्यात १ चमचा तुरटीची पावडर मिसळा. रात्रभर हे पाणी असच ठेवा. सकाळी हे पाणी गुलाबाच्या रोपात घाला. या उपायानं काही दिवसातंच गुलाबावर कळ्या येतील आणि भरपूर फुलंही येतील.
4) कॉफी बिन्स
गुलाबाच्या रोपात कॉफी बीन्स घातल्यानंही चांगली वाढ होईल. याच्या मुळांमध्ये कॉफी बीन्स वाटून घाला हे एका उत्तम खाद्याप्रमाणे काम करते ज्यामुळे रोपाच्या मुळांना पोषक तत्व मिळतात.
5) एप्पल सायडर व्हिनेगर
एप्पल सायडर व्हिनेगर गुलाबाच्या रोपात लिक्विड खताप्रमाणे काम करते. तुम्ही लिक्विड खत किंवा पाण्यात हलकं व्हिनेगर मिसळू शकता आणि मुळांमध्ये घाला. ज्यामुळे रोपांत भरभरून फुलं येतील.