कुंडीत माती भरताना ३ गोष्टी नक्की घाला, रोपं वाढतील जोमानं- बाग होईल हिरवीगार
Updated:January 29, 2025 17:01 IST2025-01-29T12:07:24+5:302025-01-29T17:01:20+5:30

रोपांची चांगली वाढ होण्यासाठी आपण कुंडीमध्ये कशा पद्धतीने माती भरतो हे फार आवश्यक असतं. कारण माती खूप चिकटही नको तसेच अजिबात पाणी धरून न ठेवणारीही नको.
म्हणूनच कधीही जेव्हा तुम्ही नर्सरीतून रोप आणता आणि ते तुमच्या कुंडीमध्ये लावता तेव्हा कुंडीतली माती पुढे सांगितलेल्या पद्धतीने भरा. यामुळे रोपाच्या मुळांना पाणी आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळेल आणि रोपांची चांगली जोमाने वाढ होईल.
सगळ्यात आधी जमिनीवर किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात तुमच्या कुंडीचा जेवढा आकार आहे त्याच्या ५० टक्के माती घ्या.
त्या मातीमध्ये जवळपास ३० ते ३५ टक्के कोकोपीट घाला.
त्यानंतर १० टक्के गांडूळखत अवश्य घाला. आणि काही प्रमाणात वीटांचे तुकडे किंवा फुटलेल्या पणत्या, माठ, बोळकी यांचे खापरं घाला.
कुंडी भरताना सगळ्यात खालच्या भागात वीट, पणत्या यांचे तुकडे घाला आणि त्यावर मग आपण तयार केलेले मातीचे मिश्रण भरा. या पद्धतीने कुंड्या भरून पाहा. झाडांची खूप छान वाढ होईल.