कुंडीतल्या रोपांवर कधीच रोग पडणार नाही, स्वयंपाकघरातल्या ३ पदार्थांचं अमृत टॉनिक- रोपं कायम ठेवतं ठणठणीत
Updated:March 4, 2026 14:14 IST2026-03-04T14:07:52+5:302026-03-04T14:14:46+5:30

बऱ्याचदा असं हाेतं की कुंडीतल्या रोपांवर काहीतरी रोग पडतो. रोपांवर पांढरा बुरशीसारखा पदार्थ दिसू लागतो.
किंवा मग कळ्यांवर, फुलांवर मुंग्या दिसू लागतात. यामुळे रोपाची चांगली वाढ होत नाही. रोप जळायला लागतं. त्याची पानं झडू लागतात. त्यामुळेच यावर त्वरीत काहीतरी उपाय करणं गरजेचं असतं.(how to make pesticide for plants at home?)
आता असं काही झालं की आपण रोपांवर विकत मिळणारे किटकनाशक शिंपडतो. पण त्यापेक्षाही खूप चांगल्या दर्जाचं नॅचरल किटकनाशक आपल्याला घरीच तयार करता येतं. त्यासाठी स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ आपण वापरू शकतो.(home hacks for fast growth of plants)
त्यासाठी सगळ्यात आधी एका बादलीमध्ये ५ लीटर पाणी घ्या. त्यामध्ये १ ग्लास ताक घाला. ताक आंबट असावं, पण खराब मात्र नाही. ताकामुळे रोपांना काेणतंही फंगल इन्फेक्शन होत नाही.(natural pesticides for plants)
त्यानंतर त्यामध्ये १ चमचा हळद घाला. हळदीमुळे रोपांना कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही.
यानंतर त्यामध्ये जवळपास ५० ते ६० ग्रॅम गूळ घाला. गूळ आगोदरच पाण्यात विरघळून घ्या. गुळामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. आता सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हे झालं तुमचं घरगुती किटकनाशक तयार.
आता हे मिश्रण रोपांवरही शिंपडा आणि तसेच कुंडीमधल्या मातीमध्ये घाला. महिन्यातून एकदाच हा उपाय करा. बघा रोपांवर कोणताही रोग पडणार नाही. तुम्हाला रोपांसाठी कधीच विकतचं किटकनाशक वापरावं लागणार नाही.