४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

Updated:June 30, 2025 16:20 IST2025-06-30T14:20:24+5:302025-06-30T16:20:16+5:30

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

रोपांना ऊन, पाणी या गोष्टींची जशी नियमितपणे गरज असते तशीच महिन्यातून एकदा त्यांना खताचीही गरज असतेच.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

आपल्याला जसे रोजच्या जेवणासाेबत फळं, सुकामेवा असे पौष्टिक पदार्थ गरजेचे असतात, तसेच काम खतं रोपांसाठी करतात.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

रोपांसाठी कित्येक वेगवेगळे प्रकारचे खत बाजारात मिळतात. पण त्या खतांएवढेच काही पौष्टिक पदार्थ आपल्या घरातही असतात. त्या पदार्थांचा योग्य उपयोग करून आपण रोपांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं NPK खत घरीच तयार करू शकतो.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

घरच्याघरी खत कसं तयार करायचं याविषयीची माहिती pinkiliciousbagiya या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली असून त्यासाठी आपल्याला थोडी चहापावडर लागणार आहे. त्यातून रोपांना नायट्रोजन मिळेल. नायट्रोजनमुळे रोपांची पानं हिरवीगार आणि आकाराने मोठी होतात.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

यानंतर त्यामध्ये आपल्याला केळीची वाळलेली पानं घालायची आहेत. त्यामुळे रोपांना भरपूर फुलं येतात.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

रोपांसाठी एनपीके खत तयार करण्यासाठी कांद्याची टरफलंही उपयोगी ठरतात. कारण त्यातून मिळणाऱ्या फॉस्फरसमुळे रोपांची मुळं पक्की होण्यास मदत होते.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

सगळ्यात शेवटी आता यामध्ये पाटीवरच्या पेन्सिलचे किंवा खडूचे थोडे तुकडे घाला. यातून रोपांना कॅल्शियम आणि इतरही पौष्टिक घटक मिळतात.

४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

हे सगळे पदार्थ एकत्र करा आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. आता हे मिश्रण कुंडीतल्या मातीमध्ये दर महिन्याला एक ते दिड चमचा या प्रमाणात मिसळा. रोपांची खूप छान वाढ होईल.