छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

Updated:September 26, 2025 09:55 IST2025-09-26T09:39:03+5:302025-09-26T09:55:30+5:30

how to grow potatoes at home : potato growing tips in pots : easy way to plant potatoes at home : बटाटे विकत आणण्यापेक्षा घरच्याघरीच, कुंडीतही लावता येईल बटाट्याचे रोप...

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या बटाट्यांना काही दिवसांनी कोंब (how to grow potatoes at home) फुटायला लागतात आणि आपण ते फेकून देतो. पण हेच कोंब आलेले बटाटे (easy way to plant potatoes at home) जर कुंडीत लावले तर घरच्याघरी ताजे बटाटे उगवता येतात. ही सोपी आणि मजेदार ट्रिक वापरुन आपण घरीच्याच गार्डनमध्ये सहज बटाटे उगवू शकतो.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. फक्त योग्य (potato growing tips in pots) पद्धत वापरून तुम्ही कमी जागेतही घरच्याघरीच बटाटे उगवू शकता. कोंब आलेल्या बटाट्यांपासून रोप कसे लावायचे, ते पाहूयात.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

१. सर्वातआधी एक मोठी आणि थोडी पसरट कुंडी घ्या. त्यानंतर, कोंब आलेल्या बटाट्याचे मध्यम तुकडे करून मातीत ४ ते ६ इंच खोलवर दाबून मातीत रोवून घ्या. जसजसे रोप वाढेल, तसतसे त्याला वरून मातीने झाकत रहा. यामुळे बटाटे उगवण्यास मदत होईल.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

२. रोपाला नियमितपणे पाणी द्या, पण माती जास्त ओली होणार नाही याची काळजी घ्या. कुंडी अशा ठिकाणी ठेवा, जिथे कमीत कमी ६ तास सूर्यप्रकाश येतो. बटाटे ८० ते १३० दिवसांत उगवून तयार होतील.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

३. जेव्हा बटाट्याच्या रोपाची पाने पिवळी पडू लागतील, तेव्हा समजून जा की मातीत बटाटे उगवले आहेत. फक्त कुंडीतील माती हलकेच बाजूला करा आणि तुमच्या स्वतःच्या हातांनी उगवलेले ताजे बटाटे काढून घ्या.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

४. बटाट्याचे रोपटे योग्य प्रकारे तेव्हाच वाढेल, जेव्हा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. जर रोपाला रोज ६ तास सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर माती खालील बटाट्यांची योग्य पद्धतीने वाढ होणार नाही. त्यामुळे कुंडी नेहमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवा.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

५. कुंडीमध्ये उगवलेले बटाटे पूर्णपणे सेंद्रिय (organic) असतात. जर तुम्ही शेणाच्या खताचा वापर केला, तर बटाटे आणखी उगवण्यास मदत होईल.