थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '८' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही...
Updated:October 25, 2025 09:30 IST2025-10-25T09:30:00+5:302025-10-25T09:30:02+5:30
home remedies to save tulsi plant in winter : how to protect tulsi plant in winter : prevent tulsi plant from drying in winter : हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी? ऐन हिवाळ्यातही तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी सोपे उपाय....

सध्या थंडीचे दिवस सुरु झाल्याने, आपल्या अंगणातील तुळशीचे रोप (how to protect tulsi plant in winter) अनेकदा कोमेजू लागते, पाने पिवळी पडतात आणि शेवटी ते सुकते. थंडीतील गार वारे, कमी सूर्यप्रकाश आणि ओलसर हवा, दवबिंदू या गोष्टींमुळे तुळशीचे रोप नीट वाढू शकत नाही( prevent tulsi plant from drying in winter).
हिवाळा सुरू होताच आपल्या तुळशीच्या रोपाला 'सुरक्षित' कसे ठेवायचे, हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल, तर काळजी करू नका. बाजारातील महागड्या खतांची किंवा उपायांची गरज नाही! घरात उपलब्ध असलेल्या काही साध्या आणि घरगुती उपायांचा वापर करून आपण तुळशीच्या रोपाला हिवाळ्यातही हिरवेगार आणि टवटवीत ठेवू शकता. कडाक्याच्या थंडीतही तुळशीचे रोप सुकू नये यासाठी खास टिप्स...
१. थंडीच्या दिवसांत तुळशीची कुंडी थेट जमिनीवर ठेवू नका. थंडी जमिनीतून लवकर शोषली जाते. कुंडीच्या खाली लाकडी फळी, एक जाड ज्यूटची चटई किंवा गवताचा जाड थर, नाहीतर जुने जाड कापड ठेवा. यामुळे जमिनीतून येणारी थंडी रोखली जाते आणि कुंडी उबदार राहते. तुळशीला थंडीतही दिवसातून किमान ४ ते ५ तास पूर्ण सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
२. थंडीत माती लवकर सुकत नाही. त्यामुळे तुळशीला जास्त पाणी देणे पूर्णपणे टाळा. जास्त पाण्याने मुळं कुजतात आणि रोप मरते. पाणी नेहमी सकाळी ११ वाजल्यानंतर द्या, जेव्हा तापमान थोडे वाढलेले असते. रात्री किंवा पहाटे पाणी देऊ नका. माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या.
३. तुळशीच्या कुंडीतील मातीवर सुकलेली पाने, भुसा किंवा नारळाच्या शेंड्यांचे छोटे तुकडे (कोकोपीट असल्यास) यांचा एक जाड थर (१ ते २ इंच) पसरा. हे 'मल्चिंग' मातीला उबदार ठेवते आणि रोपाला थंडीच्या तडाख्यापासून वाचवते. थंडीच्या दिवसांत तुळशीची कुंडी घराच्या आत, खिडकीजवळ किंवा ऊन लागणाऱ्या उबदार ठिकाणी ठेवा. यामुळे ती गार वाऱ्यापासून सुरक्षित राहते.
४. तुळशीच्या कुंडीवर एक मोठी पारदर्शक प्लास्टिकची पिशवी किंवा जुन्या सुती साडीचे कापड घाला. हे आवरण रात्रीच्या थंडीपासून रोपाचे संरक्षण करेल आणि 'ग्रीनहाऊस इफेक्ट' (Greenhouse Effect) मुळे रोपाला आवश्यक ऊब मिळेल. सकाळी ऊन आल्यावर हे आवरण लगेच काढून टाका.
५. तुळशीच्या रोपट्याजवळ अगरबत्ती, धूप किंवा दिवा लावणे देखील फायदेशीर ठरते. यामुळे तुळशीच्या रोपट्याला उष्णता मिळते. ज्यामुळे तुळशीचे रोपटे लवकर सुकत नाही आणि हिवाळ्यामध्ये देखील तुळशीचे रोपटे हिरवेगार राहते.
६. तुळशीच्या रोपाला हिरवेगार ठेवण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचे पाणी देखील वापरले जाऊ शकते. यासाठी, कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करून घ्यावे. त्यानंतर हे पाणी तुळशीच्या रोपाच्या मातीत घालावे. ज्यामुळे तुळशीचे रोपटे हिरवेगार राहील आणि पाने देखील खराब होणार नाहीत.
७. हिवाळ्याच्या हंगामात तुळशीच्या रोपाच्या मातीत हलक्या प्रमाणात जैविक खत मिसळावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरल्याने रोपाची मुळे मजबूत होतात आणि पानांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते. तसेच, थंडीच्या महिन्यांमध्ये तुळशीच्या रोपाची छाटणी करणे देखील आवश्यक असते.
८. तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी आठवड्यातून एकदा माती नक्की थोडी मोकळी करा. कुंडीतील माती थोडी वर - खाली करून घ्यावी.