रोपांना कधीच विकतचं खत घालावं लागणार नाही, 'या' पद्धतीने गुळाचं पाणी द्या, रोपं राहतील हिरवीगार
Updated:February 27, 2026 15:34 IST2026-02-27T15:27:38+5:302026-02-27T15:34:24+5:30

बागेतल्या रोपांना आपण रोज पाणी घालतो. पण तरीही ते पुरेसं ठरत नाही. कारण आपल्याला जशी पौष्टिक पदार्थांची गरज असते तशीच रोपांनाही असते. आणि ही गरज वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून भरून निघते.(best home made fertilizer for plants growth)
त्यामुळे मग कधी कधी रोपांची चांगली वाढ होत नाही. काही वेळेला त्यांना फुलंच येत नाहीत. फुलांचा आकार लहान होऊन जातो किंवा मग पानं पिवळट पडतात. छान फ्रेश दिसत नाहीत.(how to make fertilizer for flowering plants?)
अशा रोपांच्या बाबतीत असणाऱ्या कित्येक तक्रारी दूर करायच्या असतील तर रोपांना महिन्यातून एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने गुळाचं पाणी घालून पाहा (home made jaggery fertilizer for plants). यामुळे रोपांची भरभरून वाढ होईल आणि रोपं नेहमीच हिरवीगार राहतील.
यासाठी एका बादलीमध्ये ३ लीटर पाणी घ्या. त्या पाण्यात ५० ग्रॅम गूळ घाला. गुळामध्ये असणारे कित्येक घटक रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
आता यामध्ये सहा केळींची सालं बारीक चिरून घाला. केळीच्या सालांमध्ये असणारं पोटॅशियम फुलझाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरतं.
यानंतर या मिश्रणात २ ते ३ चमचे एप्सम सॉल्ट घाला. आता हे मिश्रण २ दिवस झाकून ठेवा. यादरम्यान ते व्यवस्थित फर्मेंट होईल.
यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यामध्ये आणखी तेवढंच पाणी घाला आणि हे पाणी रोपांना द्या. महिन्यातून एकदा हा प्रयोग केला तर तुम्हाला रोपांना कधीच कोणतं विकतचं खत घालावं लागणार नाही.