गुलाबाचं रोप नुसतंच वाढतं- फुलांचा पत्ताच नाही? ४ पदार्थ मातीत मिसळा- रोपांना येतील फुलंच फुलं
Updated:August 9, 2025 16:28 IST2025-08-09T16:22:12+5:302025-08-09T16:28:05+5:30

बाग छोटी असो मोठी असो.. गुलाबाचं रोप आपण हौशीने बागेत लावताेच. कारण गुलाबाला जी सुंदर फुलं येतात ती पाहूनच मन प्रसन्न होऊन जातं.(home hacks to get maximum flowers from rose plant)
पण बऱ्याचदा असाही अनुभव येतो की गुलाबाचं रोप नुसतंच वाढत जातं. त्याला अजिबात फुलंच येत नाहीत. असं होत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. पुढच्या काही दिवसांतच वेगवेगळ्या फुलांनी आणि कळ्यांनी रोप बहरून जाईल.(best homemade fertilizers for rose plant)
गुलाबाच्या रोपाला भरपूर पाणी घालू नका. २ ते ३ दिवसांतून एकदा पाणी घातलं तरी ते त्याला पुरेसं होतं. तसेच गुलाबाचं रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातून ४ ते ५ तास सुर्यप्रकाश येईल. कारण भरपूर सुर्यप्रकाशात ते रोप चांगलं वाढतं आणि फुलांसाठीही ते पोषक ठरतं.
बटाट्याचे बारीक तुकडे करा. ते एक लीटर पाण्यात भिजत घाला. साधारण २० ते २२ तास हे पाणी झाकून ठेवा. यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी त्यात मिसळा. आता हे पाणी गुलाबाच्या रोपाला घाला. काही दिवसांतच भरपूर फुलं येतील.
चहा गाळल्यानंतर गाळणीमध्ये जी चहा पावडर उरते ती स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती वाळवा आणि कुंडीतल्या मातीमध्ये मिसळून द्या. गुलाबाला फुलं येण्यासाठी ती खूप उपयोगी ठरते.
गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी कॉफी पावडरही उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी गुलाबाच्या कुंडीतली माती थोडी थोडी उकरून घ्या. त्यानंतर या मातीमध्ये कॉफी पावडर मिसळा. लहान लहान कळ्यांनी गुलाबाचं रोप बहरून येईल.