कुंडीतल्या रोपांची पानं अचानक पिवळी पडू लागली? सोपा उपाय ना खत ना केमिकल-पानं होतील हिरवीगार
Updated:August 5, 2025 17:43 IST2025-08-05T15:21:03+5:302025-08-05T17:43:27+5:30

कधी कधी असं होतं की रोपांच्या पानांची टोकं पिवळी पडायला लागतात. त्यानंतर मग ती गडद चॉकलेटी रंगाची होऊन कोरडी पडतात आणि पानाचा बाकीचा भाग पिवळट पडायला सुरुवात होते.(gardening tips)
असं साधारण एका पानाचं झालं की त्यानंतर हळूहळू इतर पानंही तशीच पिवळट, कोरडी होत जातात. जर रोपांना पुरेसं ऊन मिळालं नाही किंवा त्यांच्या मुळांमध्ये काही इन्फेक्शन असेल तर असं होतं.(what to do if the tip of leaves are getting dry and yellow?)
त्यामुळे तुमच्या पिवळ्या पडत जाणाऱ्या रोपाला पुरेसं ऊन मिळतंय की नाही याकडे एकदा लक्ष द्या. काही दिवस त्याला पुरेशा सुर्यप्रकाशात ठेवून पाहा.
वरील उपाय केल्यानंतरही रोपाच्या पानांचा पिवळेपणा वाढतच जात असेल तर मग हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये २ कप पाणी गरम करायला ठेवा. त्यात १ चमचा तंबाखू घाला आणि हे पाणी चांगले उकळून घ्या.
त्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून घ्या. त्यामध्ये १ ते २ चमचे व्हिनेगर घाला. हे पाणी रोपांवर शिंपडा आणि थोडे मातीतही टाका.
यामुळे राेपांना पोषण मिळते आणि मातीमध्ये तसेच रोपाच्या मुळाला काही इन्फेक्शन असेल तर ते ही कमी होते. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहा.