1 / 6गुलाबाची फुले ही त्यांच्या सौंदर्य आणि सुगंधासाठी ओळखल्या जातात. फुलांचे सौंदर्य आपल्या घराची शोभा वाढवतात. ऊन पावसाच्या खेळामुळे जितका आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तितकाच रोपांवर देखील होतो. ज्यामुळे रोपांना कळ्यासुद्धा उमलत नाहीत. (Rose gardening tips at home)2 / 6पावसाळ्यात गुलाबाच्या रोपाला कळ्या येतात, रोपाला टपोरी फुले फुलतात पण हवामान बदलामुळे कुंडीतले रोप सुकत असेल किंवा रोपाला फुलेच येत नसतील तर या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा. (Natural ways to grow rose flowers)3 / 6गुलाबाचे रोप लावण्यापूर्वी ते चांगल्या कुंडीत लावा. रोप लावण्यापूर्वी माती योग्यप्रकारची असायला हवी. 4 / 6मातीत खत आणि वाळू मिसळा. तसेच पाणी बाहेर जाण्यासाठी कुंडीला छिद्र आहे की, नाही हे देखील तपासा. 5 / 6गुलाबाच्या रोपाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आणि पाणी पुरेसे असायला हवे. त्याला वेळेवर पाणी द्या. तसेच रोपाला जास्त प्रमाणात पाणी दिल्यास ते त्याचे नुकसान होईल. 6 / 6गुलाबाच्या रोपामध्ये केळीचे किंवा कांद्याचे सालं खत म्हणून घाला. ज्याच्यामुळे त्याची वाढ होण्यास मदत होईल.