1 / 8कधी ऊन तर कधी पाऊस याचा जितका परिणाम आपल्या आरोग्यावर होतो तितकाच आपल्या रोपांवर देखील होतो. अचानक आलेल्या पावसामुळे रोपाचे नुकसान होत आहे. ज्यामुळे रोपांना कळ्या सुद्धा आल्या नाहीत. (Best fertilizer for Mogra plant)2 / 8उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात मोगऱ्याचे रोप फुलांनी बहरते परंतु, यंदाच्या हवामान बदलामुळे कुंडीतले रोप सुकत चालले असेल किंवा रोपाला फुलेच येत नसतील तर या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा. (Mogra plant care in changing weather)3 / 8उन्हाळ्याचा दिवस म्हणजे मोगऱ्याला बहर येण्याचे दिवस असतात जर अजूनही रोपाला बहर आला नसेल तर या सोप्या ट्रिक्स करुन पाहा. 4 / 8मोगऱ्याच्या रोपाला पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले तर ते सगळ्यात जास्त फुले देते. त्यासाठी आपल्या कुंडीतल्या मातीत शेणखत किंवा गांडूळखत २५ ते ३० दिवसांनी घालायला हवे. 5 / 8रोपात खत घालण्यासाठी बटाटा बारीक करुन त्याचा रस गाळून घ्या. त्यात तीन लिटर पाणी घाला. त्यात अर्धा चमचा चुना घाला. ते चांगले मिसळून त्यात बटाट्याचा रस घाला. 6 / 8आजूबाजूची माती काढून मग त्यामध्ये खत घाला. यामुळे रोपात जास्त माती होणार नाही. 7 / 8दोन्ही गोष्टी चांगल्या मिसळून मोगऱ्याच्या कुंडीत घाला. त्यानंतर काढलेली माती त्यावर हळूहळू घाला. किंवा कोणतेही इतर खत घालू शकता. 8 / 8सूर्यप्रकाशासोबत मोगऱ्याला वेळोवेळी पाण्याची गरज देखील असते. पुरेसे पाणी मिळाले नाही तर रोपाला फुले येत नाही.