एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल...
Updated:July 11, 2024 12:03 IST2024-07-11T11:56:22+5:302024-07-11T12:03:25+5:30

घराचं आणि बागेचं सौंदर्य वाढविणारं छानसं रोप म्हणजे एरेका पाम. या रोपाची चांगली वाढ होत नसेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा... (gardening tips for areca palm)
एरेका पाम हे असं एक रोप आहे जे तुम्ही घरातल्या एखाद्या कोपऱ्यात, जिन्यामध्ये, गच्चीवर, टेरेसमध्ये, अंगणात किंवा अगदी बेडरुममध्येही ठेवू शकता. पण बऱ्याचदा असं होतं की या रोपाची वाढ चांगली वाढ होत नाही. असं झालंच तर इतर कोणतंही खत घालण्याआधी हे काही घरगुती उपाय करून पाहा. (3 best home made fertilizers for areca palm)
एरेका पामला ॲसिडीक प्रकारातली माती लागत असते. त्यामुळे या रोपाच्या कुंडीत माती भरताना थोडं शेणखत किंवा गांडूळ खत टाका. (remedies for the fast growth of areca palm)
कांद्याची टरफलं रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी रोपाला द्या. यातून त्याला भरपूर प्रमाणात नायट्रोजन मिळेल आणि चांगली वाढ होईल. किंवा कांद्याची टरफलं मिक्सरमधून काढून त्यात पाणी मिसळून ते तुम्ही पामच्या कुंडीतल्या मातीत टाकू शकता.
चहा गाळून झाल्यानंतर गाळणीमध्ये जी चहा पावडर जमा होते, ती पुर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर ती पामच्या कुंडीतल्या मातीत मिसळा. यामुळेही पामची वाढ चांगली होईल.
पामला जर तुम्ही कडक उन्हात ठेवलं तर ते चांगलं बहरून येत नाही. शिवाय त्याला खूप जास्त पाण्याचीही गरज नसते. कुंडीतली माती ओलसर राहील, एवढंच पाणी त्याला पुरेसं आहे.