Join us   

उन्हाळ्यात मिरची, भेंडीसह 'या' ७ भाज्यांची रोपं लावा, घरच्या बागेतूनच मिळेल आठवडाभराची ताजी भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 3:15 PM

1 / 9
कुंडीतल्या भाज्यांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना हवामान अनुकूल पाहिजे. काही ठराविक भाज्यांच्या वाढीसाठी उन्हाळा अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे त्या भाज्यांच्या बिया आतापासूनच म्हणजे मार्च महिन्यातच तुम्ही लावायला पाहिजे.
2 / 9
अशा उन्हाळ्यात भरभरून येणाऱ्या भाज्या कोणत्या याविषयीचा व्हिडिओ myplantsmygarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
3 / 9
यामध्ये सांगितलेले सगळ्यात पहिली भाजी आहे भेंडी. उन्हाळ्यात भरपूर भेंडी पाहिजे असेल तर आताच तिच्या बियांची खरेदी करून टाका.
4 / 9
उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या मोठ्या पसरट कुंडीमध्ये किंवा टबमध्ये तुम्ही कांदाही लावू शकता.
5 / 9
मिरची लावण्यासाठी छोटी कुंडीही पुरेशी आहे. मिरचीचं रोप उन्हाळ्यात भरभरून वाढेल.
6 / 9
एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये दुधीभोपळाही चांगला लागतो. मात्र यासाठीची कुंडी खोलगट आणि मोठी असावी.
7 / 9
टोमॅटोचं रोपही तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. सध्याचं हवामानही टोमॅटोच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल आहे.
8 / 9
कारल्याच्या बियाही या दिवसात लावून पाहा. मोठ्या पसरट कुंडीमध्ये हे रोप लावा.
9 / 9
गवार, बीन्स अशा शेंगांच्या वाढीसाठीही हा ऋतू चांगला आहे.
टॅग्स : बागकाम टिप्सगच्चीतली बागभाज्या