1 / 9बागेत, बाल्कनीत एकदा का झाड लावले की ते पोटच्या पोराप्रमाणे जपायचे. तोही एक जीवच आहे. आवडीने लावलेली झाडे जगवता आली पाहिजेत. झाडाला पाणी दिले म्हणजे काम झाले असे नसते. त्याची विविध प्रकारे काळजी घ्यावी लागते. 2 / 9झाडाची, रोपाची गुणवत्ता काही कारणांमुळे अनेकदा कमी होते. त्यासाठी विविध उपाय असतात. तसेच औषधेही मिळतात. मात्र नक्की काय झाले आहे, त्याची लक्षणे काय आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे. जसे लहान मुल त्याला सर्दी झाली की खोकला याची लक्षणे दाखवते, तसेच झाडाची पानेही त्रासाचे स्वरुप सांगत असतात.3 / 9पानावर डाग दिसला किंवा काहीही वेगळे दिसले की आपण कीड लागली आहे अशा निष्कर्षावर येतो. मात्र पान पाहून नक्की काय समस्या आहे याचा अंदाज लावता येतो. 4 / 9झाडाचे पान जास्त सुके दिसत असेल. एका दिशेला वळून वाकत असेल याचा अर्थ त्याला पाण्याची गरज आहे. कोरड पडत आहे. त्यामुळे लगेच पाणी घालणे गरजेचे असते. 5 / 9झाडाची पाने कधीतरी करपल्यासारखी दिसतात. एका बाजूला डागाळल्यासारखी दिसतात. असे असल्यास झाडाला सावलीची गरज आहे असे समजून जायचे. जास्त उनामुळे पान करपते. 6 / 9पान टोकाला पिवळे पडते. अनेकदा पानांचा असा रंग बदलतो. त्याचे कारण म्हणजे झाडाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. तो कमी मिळाल्यामुळे पाने पिवळी पडतात. 7 / 9पान अति पिकलेले दिसते. पूर्ण पानंच रंग बदलायला लागते. पानाचा असा रंग बदलणे किंवा फिकट होणे म्हणजे झाडाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी मिळत आहे. पाणी जरा कमी देत जा. 8 / 9पानावर अनेकदा लहान भोकं तयार होतात. त्यांना पिवळट अशी बॉर्डरही तयार होते. दिसायला ते पान फार विचित्र दिसते. याचा अर्थ झाडाला बुरशी लागायला सुरवात झाली आहे. बुरशी लागल्यावर रोपाची फार वाट लागते. 9 / 9पानावर अनेकदा विविध नक्षीसारखी भोकं पडतात. कारण कोणत्या तरी किड्याने ते खाल्ले असते. पानांवरील भोकं झाडाला कीड लागल्याचे दर्शवते.