फक्त १ चमचा चहा पावडरचा करा ‘हा’ उपाय, कुंडीतल्या सगळ्या झाडांना येतील भरपूर फुलं
Updated:April 25, 2025 17:55 IST2025-04-25T14:49:54+5:302025-04-25T17:55:12+5:30

सध्या मोगरा, मधुमालती, मधुकामिनी या फुलांचा हंगाम आहे. पण असा हंगाम असतानाही या रोपांना फुलं येत नसतील तर त्यासाठी हा एक अतिशय सोपा उपाय करून पाहा..
हा उपाय तुम्ही गुलाब, जास्वंद, सदाफुली, जाई- जुई, चमेली, गाेकर्ण अशा सगळ्या फुलझाडांसाठी करू शकता.
हा उपाय करण्यासाठी १ लीटर पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये १ चमचा चहा पावडर टाका.
आता या पाण्यावर झाकण ठेवून द्या आणि ते २० ते २२ तास तसेच ठेवून द्या. हे पाणी पुरेसा सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे.
यानंतर हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि फुलझाडांना घाला. तसेच थोडे पाणी रोपावरही शिंपडा. काही दिवसांतच खूप चांगला फरक दिसून येईल.
महिन्यातून एकदा हा उपाय करावा, अशी माहिती seekho_gardening या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.