1 / 6रोपांच्या बाबतीतल्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. पण त्याचा योग्य वापर कसा करून घ्यायचा हेच माहिती नसतं..2 / 6म्हणूनच या काही टिप्स पाहा आणि अगदी घरच्याघरी बेकिंग सोडा वापरून रोपांची कशी काळजी घ्यायची ते बघा.3 / 6५ ग्रॅम बेकिंग सोडा १ लीटर पाण्यात भिजत घाला आणि नंतर हे पाणी पानांवर शिंपडा. पानांचा रंग अधिक गडद हिरवा होऊन रोपाची वाढही चांगली होईल. 4 / 6५ ग्रॅम बेकिंग सोडा अर्धा लीटर पाण्यात विरघळून घ्या. नंतर या पाण्यात १ चमचा व्हाईट व्हिनेगर घाला. आता हे पाणी १५ दिवसांतून एकदा रोपाला द्या. यामुळे मातीची पीएच लेव्हल चांगली राहाते आणि रोपंही जोमाने वाढतात.5 / 6जर रोपांवर पांढरा मावा पडल्यासारखा वाटत असेल तर ५ ग्रॅम बेकिंग सोडा, ५ ग्रॅम साखर अर्धा लीटर पाण्यामध्ये मिसळा आणि हे पाणी रोपांवर शिंपडा. रोपं निरोगी राहतील.6 / 6बेकिंग सोडा घेऊन तो गरम पाण्यात मिसळा आणि हे पाणी कळ्यांवर शिंपडा. फुलांचा आकार जास्त टपोरा होईल आणि त्यांचा रंगही जास्त चमकदार दिसेल.