1 / 6थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये लिंबाचं रोप लावणं शक्य आहे. त्यामुळे कित्येक घरांमध्ये हौशीने लिंबाचं रोप लावलं जातं.2 / 6पण बऱ्याचदा असं होतं की पुरेशी काळजी घेऊनही रोपाला लिंबू येतच नाहीत. त्यामागचं एक कारण असंही असू शकतं की तुम्ही लिंबाच्या रोपाशेजारी काही अशी रोपं लावलेली आहेत जी लिंबाच्या वाढीसाठी पोषक नाहीत.(avoid these 5 plants besides lemon plant) 3 / 6त्यापैकी एक आहे बडिशेपाचं रोप. बडिशेपाचं रोप असे काही वायू सोडत असतं जे लिंबाच्या रोपाच्या वाढीसाठी अजिबातच चांगले नसतात.4 / 6गार्डनिंग एक्सपर्टच्या मते लिंबाच्या रोपाच्या शेजारी पुदिन्याचं रोपही लावू नये. कारण ते वेगात पसरत जास्त आणि मातीमधले पौष्टिक घटक शोषून घेतं. त्यामुळे लिंबाची हवी तशी वाढ होत नाही. 5 / 6गाजर, मुळा, बटाटा, बीटरुट असे कंदमुळंही लिंबाच्या शेजारी लावू नयेत. 6 / 6बोरीचं झाड, नागणवेल, बोगनवेल असे काटेरी रोपंही लिंबाच्या शेजारी नसावेत. यामुळेही लिंबाच्या रोपाचं नुकसान होऊ शकतं.