उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

Updated:May 19, 2025 14:05 IST2025-05-19T13:53:46+5:302025-05-19T14:05:46+5:30

How to care of tulsi plant in summer : Tulsi Green & Healthy Plants Maintain in Summer Season : How to care for tulsi plant in summers : 8 tips to maintain Tulsi plant in summers : उन्हाळ्यात तुळशीचे रोपं दिसेल हिरवेगार ,फक्त घ्या 'अशी' काळजी...

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

आपल्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोपं (How to care of tulsi plant in summer) असतेच. ही तुळस जर हिरवीगार असेल तरच दिसायला सुंदर दिसते. पण उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, या तुळशीला (8 tips to maintain Tulsi plant in summers) रखरखत्या सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागतो. गरम वारे, उष्णता, कोरडी माती आणि ओलाव्याचा अभाव यामुळे तुळशीची पाने कोमजतात, आणि ती हळूहळू सुकू लागते.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

उन्हाळ्यात अनेकदा तुळशीची कितीही देखभाल (How to care for tulsi plant in summers) केली तरी ती थोड्याफार प्रमाणात सुकतेच. योग्य काळजी, योग्य वेळी पाणी, थोडी सावली आणि थोडं प्रेम इतकंच तुळशीच्या रोपाल गरजेचं असतं. तुळस उन्हाळ्यात सुकते अशी बरेचदा अनेकांची तक्रार असते. यासाठीच, उन्हाळ्यात तुळस सुकू नये म्हणून कोणत्या १० चुका करु नये ते पाहूयात...

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

बहुतांश वेळा आपण तुळशीच्या रोपाला खूप जास्त किंवा खूप कमी पाणी देतो, आणि त्यामुळेच ती सुकायला लागते. त्यामुळे तुळशीला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा कधी तुळशीला पाणी घालायचं असेल, तेव्हा सर्वप्रथम मातीला हात लावून तपासा – ती ओलसर आहे की कोरडी. जर माती ओलसर असेल, तर पाणी देऊ नका. पण माती कोरडी वाटली, तर मग तुळशीला माती ओलसर होईल इतक्या प्रमाणांत पाणी घालावे, यामुळे तुळस उन्हाळ्यात देखील हिरवीगार राहते.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

तुळशीचं रोप चिकण मातीमध्ये नीट वाढत नाही. त्यामुळे तुळस जर कुंडीत लावायची असेल, तर मातीमध्ये कंपोस्ट म्हणजेच सेंद्रिय खत व शेण खत घालावे. यासोबतच मातीत थोडी वाळू मिसळावी. अशा प्रकारच्या मातीत तुळस चांगल्या पद्धतीने रुजते.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी आणि फुलण्यासाठी जागेची आवश्यकता असते. त्यामुळे तिला लहान कुंडीत न लावता थोडी मोठी आणि मातीची कुंडी वापरणं अधिक योग्य ठरतं. मातीच्या कुंडीमुळे उन्हाळ्यात रोपांच्या मुळांना थंडावा मिळतो.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

जेव्हा मातीत शेवाळ साचायला लागते, भेगा पडतात किंवा रोप कोमेजलेलं आणि सुकलेलं वाटतं, तेव्हा खुरप्याने माती हलकेच वर - खाली उकरुन घ्यावी. करणं आवश्यक असतं. माती हलकेच उकरुन मोकळी केल्यानंतर पाणी किंवा खत दिल्यास रोपाला पोषणद्रव्ये अधिक प्रमाणात मिळतात.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

तुळशीच्या रोपावर येणारी मंजिरी वेळोवेळी तोडत राहावी. काहीवेळा आपण मंजिरी काढत नाहीत, आणि त्यामुळे तुळस हळूहळू सुकायला लागते. मंजिरी तोडण्याचा एक फायदा असा आहे की, त्या मंजिरीतून पडणाऱ्या बियांपासून तुम्ही नवीन तुळशीचं रोपही तयार करू शकता.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

तुळशीच्या रोपाला नैसर्गिक खत वेळेवर न दिल्यास ते सुकायला लागते. त्यामुळे दर १५ ते २० दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा तुळशीच्या रोपाला शेणखत, किंवा कडुलिंबाच्या पानांची पावडर यांसारखी नैसर्गिक खतं द्यावीत. अशा खतांमुळे तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होते आणि ते निरोगी राहते.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

तुळशीच्या रोपाला लागणाऱ्या किडीमुळे सुद्धा तुळशीचं रोप सुकायला लागते. त्यामुळे तुळशीच्या रोपांवर कीड लागू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. यासाठी तुम्ही नियमितपणे कडुलिंबाच्या पानांचं पाणी तुळशीच्या रोपाला घालू शकता. हे पाणी नैसर्गिक कीटकनाशकासारखं काम करतं आणि तुळशीचं रोप निरोगी राहायला मदत होते.

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

तुळशीच्या रोपाला दररोज किमान २ ते ३ तास थेट सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यानंतर तुम्ही ती सावलीत ठेवू शकता. अनेकजण तुळस कायम सावलीत ठेवतात, आणि त्यामुळे ती सुकायला लागते. म्हणून तुळस निरोगी ठेवायची असेल, तर तिला दररोज थोडा तरी सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे.