1 / 9घर कितीही साफसफाई करुन स्वच्छ (Houseplants that reduce dust in your home) ठेवले तरीही, थोड्या दिवसांनी संपूर्ण घरात आणि इतर वस्तूंवर धूळ बसते. घरातील (These 7 Indoor Plants Reduce Dust From Your Home & Purifies Air) धुळीचे प्रमाण कमी करून घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी आपण घरात वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावतो. 2 / 9घरातील धूळ - प्रदूषण कमी करून घरातील (7 Best Air Purifying Indoor Plants) वातावरण प्रसन्न आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरात कोणती रोपं लावावी ते पाहूयात. 3 / 9इंग्लिश आयव्ही नावाचे हिरव्या पानांचे रोपं एक नॅचरल प्युरिफायर म्हणून ओळखले जाते. हे रोपं घरातील उष्णता आणि गरमी कमी करण्यास मदत करते. यामुळे घरातील वातावरण थंड राहते. हे रोपं घरातील प्रदूषण कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. या रोपांची पाने घरातील धूळ आणि वायुप्रदूषण स्वतः शोषून घेते. ज्यामुळे घरात धूळ आणि वायुप्रदुषण होत नाही. 4 / 9 पीस लिलीचे रोपं जितके दिसायला सुंदर आणि नाजूक असते, तितकेच ते घरात असणे देखील फायदेशीर ठरते. घरात दररोज येणाऱ्या धुळीने जर तुम्ही हैराण झाले असाल तर घरात एखादं पीस लिलीच रोपं नक्की लावावं. या रोपाची पानं एखाद्या चुंबकाप्रमाणेच धूळ आणि प्रदूषण शोषून घेतात. त्यामुळे घरातील धुळीचे प्रमाण कमी होण्यास अधिक मदत मिळते. 5 / 9घरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्पायडर प्लांट अतिशय फायदेशीर ठरते. स्पायडर प्लांट या रोपांची पानं धूळ अगदी लगेच शोषून घेतात. या रोपाची फारशी देखभाल देखील करावी लागत नाही. आठवड्यातून एकदा पाणी आणि सूर्यप्रकाश दाखवणे देखील या रोपाच्या वाढीसाठी पुरेसे आहे. 6 / 9पिग्मी पाम हे रोप दिसायला खजुराच्या झाडाप्रमाणेच असते. याच्या पानांचा आकार लांब निमुळता आणि खालच्या बाजूने टोकदार असतो. हे रोप घरात लावल्याने घरातील धुळीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. या रोपाची फारशी देखभाल करावी लागत नाही, आठवड्यातून एकदा पाणी आणि सूर्यप्रकाश इतक्याच गोष्टींची गरज असते. 7 / 9घरात स्नेक प्लांट लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे प्लांट घराची शोभा वाढवण्यासोबतच घरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यास देखील तितकेच फायदेशीर ठरते. धूळ आणि वायुप्रदूषणातील बेंजीन, फॉर्मेल्डिहाइड आणि जाइलीन सारखी कार्बनयुक्त विषारी घटकांचे प्रमाण कमी करून घर प्रदूषणमुक्त ठेवण्यास मदत करते. 8 / 9 रबर प्लांटच्या रोपांची पाने वातावरणातील धूलिकण आपल्याकडे आकर्षित करून घेतात. यामुळे घरभर धूळ न होता घर स्वच्छ राहण्यास अधिक मदत होते. 9 / 9आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच घरात कोरफडीचे रोपं असतेच. कोरफडीची अरुंद पानं वातावरणातील फॉर्मेल्डिहाइड सारखे कार्बनयुक्त धूलिकण कमी करण्यास उपयोगी ठरतात. यामुळे घरातील धूळ निघून जाऊन घर स्वच्छ दिसते.