Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

Updated:August 29, 2025 15:15 IST2025-08-29T12:37:24+5:302025-08-29T15:15:24+5:30

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

स्वयंपाकात बेकिंग सोडा जसा उपयुक्त ठरतो तसाच तो गार्डनिंगसाठीही खूप फायदेशीर असतो.(5 uses of baking soda for plants)

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

तुम्ही जर योग्य पद्धतीने गार्डनिंगसाठी बेकिंग सोडा वापरला तर रोपांची चांगली वाढ तर हाेईलच पण तुम्हाला रोपांसाठी कधीच विकतचं खत किंवा किटकनाशक विकत घेण्याची गरज पडणार नाही.(how to use baking soda for plants growth?)

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

बेकिंग सोड्याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने रोपांसाठी वापर करता येतो. एक ग्लास पाण्यामध्ये ५ ग्रॅम बेकिंग सोडा मिसळा आणि ते पाणी रोपांवर शिंपडा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास पानं हिरवीगार होतात.

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

पाव लीटर पाण्यात ५ ग्रॅम बेकिंग सोडा आणि १ ते २ चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. हे पाणी रोपांवर शिंपडा. रोपाला भरपूर फुलं येतील.

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

कुंडीतली माती जर खूप जुनी झाली असेल पण तुम्हाला ती बदलायला वेळ नसेल तर वरवरची माती थोडी उकरा आणि तिच्यामध्ये बेकिंग सोडा घाला. मातीची गुणवत्ता सुधारेल.

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

जर रोपांवर पांढरा बुरशीसारखा रोग पडला असेल किंवा रोपावर किडा दिसत असेल तर २५ ग्रॅम बेकिंग सोडा आणि ५ ग्रॅम साखर पाव लीटर पाण्यामध्ये मिसळा आणि हे पाणी रोपांवर शिंपडा. रोग कमी होईल.

Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

बेकिंग सोडा आणि पाणी हे मिश्रण फुलांवर शिंपडल्यास फुलांचा रंग अतिशय चमकदार आणि गडद होतो.