कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

Updated:August 8, 2025 09:35 IST2025-08-08T09:30:00+5:302025-08-08T09:35:04+5:30

5 things for more flowers in mogra plant : natural fertilizer for mogra plant : home remedies for flowering mogra : 5 Things Are Useful To Get More Flowers & Increase Growth Faster Of Mogra Plant : मोगऱ्याचे रोप फुलांनी बहरुन येण्यासाठी मातीत मिसळा हे ५ पदार्थ...

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

मोगऱ्याचे फुल आपला मनमोहक सुगंध आणि सुंदर पांढऱ्याशुभ्र रंगामुळे अगदी (5 things for more flowers in mogra plant) सगळ्यांनाच प्रिय असते. आपल्यापैकी (natural fertilizer for mogra plant) अनेकजण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये मोगऱ्याच्या फुलांचं रोप मोठ्या हौसेनं लावतात. हे मोगऱ्याच रोपं नेहमी फुलांनी बहरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेकवेळा रोपाला फुलचं येत नाही(5 Things Are Useful To Get More Flowers & Increase Growth Faster Of Mogra Plant).

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

मोगऱ्याच्या प्रत्येक फांदीवर फुलांचा गुच्छ पसरलेला पाहायचा असेल, तर नेहमीच्या (home remedies for flowering mogra) वापरातील अशा ५ गोष्टी आहेत, ज्या मोगऱ्याच्या रोपासाठी अमृतासमान आहेत. चक्क काहीच उपयोग नाही म्हणून कचऱ्याच्या डब्यांत फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपाला पुन्हा छान हिरवेगार करु शकतात. या गोष्टी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरल्यास मातीला भरपूर पोषण मिळते आणि रोप जोमाने बहरते व फुलं देखील उमलू लागतात. अशा कोणत्या ५ गोष्टी आहेत ते पाहूयात...

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

लसूण पाकळ्यांचे पाणी हे एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतं. हे मोगऱ्याच्या रोपाला कीड आणि बुरशीपासून सुरक्षित ठेवतं. हे पाणी तयार करण्यासाठी लसूणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून पाण्यात मिसळा. हे मिश्रण काही तास तसेच ठेवून द्या आणि नंतर गाळून घ्या. गाळून घेतलेलं पाणी थेट मातीमध्ये ओता किंवा स्प्रे बाटलीत भरून झाडावर फवारणी करा. यामुळे झाड निरोगी राहील आणि फुलांची संख्याही वाढेल.

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

डाळी धुवून घेतलेल्या पाण्यामध्ये प्रोटीन आणि अनेक पोषकतत्व असतात. जे झाडांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतं. दररोज डाळी धुवून त्यांचे पाणी रोपाला घातल्यास मातीची सुपीकता वाढते आणि झाड अधिक निरोगी व मजबूत होतं. त्यामुळे डाळ धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याची चूक करू नका, तर ते आवर्जून झाडांना घाला.

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

लाकडाची राख ही पोटॅशियम आणि फॉस्फरससारख्या पोषकतत्त्वांचा चांगला स्रोत आहे, जी मोगऱ्याच्या रोपावर फुलांची संख्या वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. दर महिन्यातून एकदा थोडीशी लाकडाची राख मोगऱ्याच्या रोपाच्या मातीमध्ये मिसळावी. यामुळे मातीचा पीएच लेव्हल संतुलित राहतो आणि रोपाला बहर येण्यासाठी आवश्यक पोषण मिळतं.

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

तांदूळ धुतल्यानंतर उरलेलं पाणी हे झाडांसाठी एक प्रकारचं सुपरफूड मानलं जातं. या पाण्यात स्टार्च आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हे झाडांसाठी उत्तम नैसर्गिक खत मानलं जातं. तांदूळ धुतल्यानंतर जे पहिलं पाणी निघतं ते मोगऱ्याच्या रोपाच्या मातीमध्ये टाका. यामुळे झाडाची मुळे बळकट होतील, वाढही चांगली होईल आणि फुलांची संख्याही वाढेल.

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

आंबट ताक हे झाडांसाठी एक प्रकारचे नैसर्गिक खत आहे. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि गुड बॅक्टेरिया असतात, जे मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. थोडं आंबट ताक पाण्यात मिसळून मोगऱ्याच्या रोपात घालावं. याचा वापर महिन्यातून एक किंवा दोन वेळाच करावा. या सोप्या आणि मोफत उपायांमुळे तुम्ही मोगऱ्याच्या रोपाची वाढ वेगाने करू शकता आणि अधिक फुलं देखील येण्यासाठी मदत होईल.