घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

Updated:May 16, 2025 18:15 IST2025-05-16T17:42:15+5:302025-05-16T18:15:33+5:30

5 Plants That Are Good For Your Skin, Hair : Top 5 plants for skin & hair the best ways to use them : घराची सजावटच नाही तर ही रोपं आहेत नॅचरल ब्यूटी सिक्रेट...

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

आपल्या घरात, बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची (5 Plants That Are Good For Your Skin, Hair) रोपं आपण मोठ्या हौसेने लावतोच. यातील काही रोपं सजावट करण्यासोबतच आपल्या स्किन केअरसाठी देखील तितकीच फायदेशीर असतात.

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

स्किन केअरसाठी आपण काही घरगुती उपाय करताना वेगवेगळ्या (Top 5 plants for skin & hair the best ways to use them) प्रकारचे फेसमास्क घरच्याघरीच तयार करतो. यासाठी आपण आपल्या घरात लावलेल्या औषधी आणि त्वचेसाठी उपयुक्त असणाऱ्या रोपांच्या पानांचा समावेश करू शकतो. यासाठीच, तुमचे स्किन केअर करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची रोपं घराच्या गार्डनमध्ये लावू शकता ते पाहूयात.

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

स्किन केअर आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये एलोवेरा जेलचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. स्किनसाठी एलोवेरा जेल अतिशय फायदेशीर असते. एलोवेरा जेल त्वचेसाठी अमृतासमान आहे, यामुळे त्वचेला थंडावा मिळतो, सनबर्न कमी होते, आणि चेहऱ्याला ग्लो येतो. यासाठी आपण घरात किमान एक तरी कोरफडीचे छोटे रोपं कुंडीत लावायला हवे.

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

तुळस अनेक प्रकारे उपयोगी ठरते. त्वचेसाठी तर तुळस अतिशय गुणकारी असते. त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक तयार करताना आपण त्यात तुळशीच्या पानांचा रस देखील घालू शकतो. तुळशीची पानं त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात, यासाठी घरात बहुगुणी अशा तुळशीचे रोपं हवेच.

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

तुळशीप्रमाणेच पुदिना देखील त्वचेसाठी तितकाच गुणकारी आणि फायदेशीर असतो. पुदिना त्वचेला आतून स्वच्छ करून नैसर्गिक थंडावा देते. आपण त्वचेसाठी अनेक प्रकारचे घरगुती फेसमास्क तयार करतो, यात आपण पुदिन्याची पाने देखील घालू शकतो. यामुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात, यासाठी पुदिन्याचे रोपं देखील छोट्याशा कुंडीत लावणे आवश्यक आहे.

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

कडुलिंबाची पाने त्वचेसाठी वरदानच आहेत. यात असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतात. कडुलिंबाच्या पानांचे पाणी किंवा पानांची पेस्ट आपण त्वचेवर लावू शकतो. यासाठी, कडुलिंबाचे रोपं घरात असणे गरजेचे असते.

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

गुलाबाच्या पाकळ्या आणि पानांमध्ये त्वचेसाठी आवश्यक असे अनेक उपयुक्त गुणधर्म असतात. गुलाबाच्या पाकळ्यांचे गुलाबपाणी करता येते तसेच त्वचेसाठी फेसपॅक तयार करताना आपण त्यात गुलाबाच्या पाकळ्या देखील घालू शकतो. यासाठी घराची सजावट किंवा शोभेसाठी गुलाबाचे रोप लावण्यासोबतच ते आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.