1 / 7बऱ्याच लोकांना रात्री लवकर झोप येतच नाही. कितीतरी वेळ अंथरुणात लोळत पडावं लागतं, तेव्हा कुठे मध्यरात्री कधीतरी डोळा लागतो. पण तरीही शांत अशी झोप होतच नाही..2 / 7असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर ही काही रोपं तुमच्या बेडरुममध्ये नक्की ठेवा. या रोपांमुळे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते. शिवाय हवेतले विषारी वायुही शोषून घेतले जातात. त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते..3 / 7पहिलं रोप म्हणजे एरिका पाम. एरिका पाम हे घरात ठेवायला अतिशय उत्तम असून ते भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं..4 / 7दुसरं आहे स्पायडर प्लांट. हे छोटे छोटे प्लांट तुम्ही बेडरुममध्ये ठिकठिकाणी ठेवू शकता. यामुळे बेडरुमचा लूक बदलेल, शिवाय शांत झोपही येईल.5 / 7स्नेक प्लांट तर बेडरुम प्लांट म्हणूनच विशेष ओळखलं जातं. हे रोप भरपूर प्रमाणात ऑक्सिजन तर देतंच, शिवाय हवेतले दुषित घटक शोषून घेण्यासही मदत करतं..6 / 7पीस लीली हे प्लांट अगदी कमी उजेडातही छान राहाते. शिवाय ते हवेतले बेनझीन, ट्रायक्लोरो इथलिन, फॉर्मलडिहाईड असे विषारी घटक शोषून घ्यायला मदत होते.7 / 7रबर प्लांटही काही दिवस बेडरुममध्ये ठेवून पाहा. हवा शुद्ध ठेवण्यासाठी हे रोप खूप उपयुक्त ठरतं.