जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..

Updated:June 30, 2025 16:24 IST2025-06-29T09:06:31+5:302025-06-30T16:24:21+5:30

जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..

जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नसतील तर हे काही साधे सोपे उपाय करून पाहा. यामुळे तुमचं जास्वंदाचं रोप नेहमीच फुलांनी बहरलेलं राहील.

जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जास्वंदाच्या रोपाची नियमितपणे कटिंग करणं खूपच गरजेचं आहे. नियमितपणे कटिंग केल्यास त्याला जास्त फांद्या फुटतात आणि ते जास्त बहरून येतं.

जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..

जास्वंदाच्या कुंडीला कधीही खूप पाणी घालू नका. जमीन ओलसर राहील एवढंच पाणी त्याला पुरेसं असतं.

जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..

जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी केळीच्या सालींचं घरगुती खत खूप उपयुक्त ठरतं. यासाठी केळीची सालं १० ते १२ तास पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर ते पाणी जास्वंदाला द्या. भरपूर फुलं येतील.

जास्वंदाला फुलंच येत नाहीत? ४ साध्यासोप्या टिप्स-येईल इतका बहर की रोपही वाकेल..

जास्वंदाच्या रोपाला ऊन प्रिय आहे. त्यामुळे जिथे त्याला ३ ते ४ तास चांगलं ऊन मिळेल अशाच ठिकाणी जास्वंदाची कुंडी ठेवा. जास्वंदाची चांगली वाढ होईल.