1 / 5ऐन उन्हाळ्यातली दुपार म्हणजे नुसती रखरख, गरम वारं आणि प्रचंड उकाडा.. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस कधी कधी असह्य होऊन जातात. नाही म्हणायला पंखा, कुलर, एसी असतं. पण ते तेवढ्यापुरतंच...2 / 5या रखरखीत दिवसांमध्ये तुमच्या घरात थोडासा गारवा निर्माण करायचा असेल तर पुढे सांगितलेली काही रोपं उन्हाळ्यात घरातल्या एखाद्या कोपऱ्यात नक्कीच आणून ठेवा. यामुळे घर तर छान, फ्रेश दिसेलच पण ती रोपं तुमचं घर थंडगार ठेवण्यासाही मदत करतील.3 / 5त्यापैकी पहिलं आहे एरिका पाम. हे रोप कमी सुर्यप्रकाशातही छान वाढतं. शिवाय त्याला खूप मेंटेनन्सची गरजही नसते. हे रोप काही दिवस घरात आणून ठेवून पाहा. त्याचा गर्द हिरवा रंग डोळ्यांना आणि मनाला नक्कीच सुखद गारवा देऊन जाईल.4 / 5दुसरं आहे पीस लीली. या रोपाला ऊन नकोच असतं. त्यामुळे तुमच्या घरात ते अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला फक्त १ ते दिड तास थेट सुर्यप्रकाश मिळेल. कारण तेवढाच त्याला पुरेसा होतो. शिवाय सतत पाणी घालण्याची गरजही नसते. या दिवसांत पीस लीलीला छान पांढरीशुभ्र फुलं येतात. ती देखील मन प्रसन्न करून टाकतात.5 / 5तिसरं आहे स्पायडर प्लांट. या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी लहानशा कुंडीत लावून घरात कुठेही सहज ठेवता येतं. त्यासाठी मोठ्या कुंडीची अजिबातच गरज नसते. हॉलमधल्या टिपॉयवर किंवा डायनिंग टेबलवर, एखाद्या खिडकीमध्येही ते लहानशा कुंडीत ठेवता येतं. छोटंसं असूनही घराच्या सौंदर्यात तर भर घालतंच पण हवेमधले दुषित घटक शोषून हवा शुद्ध ठेवण्यासही मदत करतं.