तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

Updated:October 16, 2025 17:23 IST2025-10-16T16:24:16+5:302025-10-16T17:23:25+5:30

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

वरण किंवा आमटी बहुतांश लोकांच्या आहारात नेहमीच असते. त्यातही तूर, मूग या डाळीचं वरण जास्त प्रमाणात केलं जातं. पण कोणती डाळ कोणता शारिरीक त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते, हे जर समजलं तर आपल्या तब्येतीनुसार आमटीची निवड केली जाऊ शकते.

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

म्हणूनच डॉ. रोहित साने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती पाहा आणि तुमच्या तसेच तुमच्या घरातल्या मंडळींच्या तब्येतीनुसार कोणती डाळ अधिक उत्तम ठरू शकते ते बघा..

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

ज्यांचं बीपी नेहमीच वाढलेलं असतं त्यांच्यासाठी तुरीची डाळ खाणं फायद्याचं ठरतं. कारण या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं जे शरीरातल्या सोडियमला संतुलित ठेवून बीपी नियंत्रणात ठेवतं.

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मसूर डाळ खावी. या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे शुगर स्पाईक होत नाही. शिवाय इन्सुलिन रेझिस्टन्स नियंत्रित ठेवण्यासाठीही ही डाळ उपयुक्त ठरते.

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही डाळ जाॅईंट पेनचं दुखणं असणाऱ्यांनी नियमितपणे खायला हवी.

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

ज्या लोकांना ब्लोटींग, गॅसेस, ॲसिडीटी असे पचनाचे त्रास नेहमीच होतात त्या लोकांसाठी मुगाची डाळ खाणं फायदेशीर ठरतं.

तुमच्यासाठी कोणत्या डाळीचं वरण चांगलं? तुमच्या तब्येतीनुसार ठरवा, तज्ज्ञांचा खास सल्ला-सोपी युक्ती

ज्यांचं कोलेस्टेरॉल जास्त असतं त्यांच्यासाठी चना डाळ म्हणजेच हरबऱ्याची डाळ खाणं फायद्याचं ठरतं. कारण तिच्यामध्ये सोल्युबल फायबर जास्त प्रमाणात असतात.