Join us   

आजचा रंग जांभळा : जांभळ्या रंगाचे ६ पदार्थ, हे नियमित खाल्लेच नाही तर तब्येत शंभर टक्के बिघडणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 8:00 AM

1 / 7
प्रत्येक खाद्यपदार्थाला रंग देणे हा निसर्गाचा नियम आहे. शरीराच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे संतुलित आहारासोबतच सगळ्या रंगांच्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करणे होय. वेगवेगळ्या रंगांचे अन्नपदार्थ फक्त आपली प्लेट रंगीबेरंगीच करत नाहीत, तर प्रत्येक एका रंगाचे अन्न पदार्थ आपल्या शरीराला विशिष्ट पोषक तत्व पुरवतात. आजचा रंग जांभळा, या रंगाचे पदार्थ दुर्मिळ असले तरीही हे पदार्थ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरात आधीच अस्तित्वात असलेल्या इतर अँटिऑक्सिडंट्सची ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात(Today's Color Purple : Check out 6 Nutritious Purple Foods, Include In Your Diet).)
2 / 7
भरली वांगी हा महाराष्ट्रात केला जाणारा खास ग्रामीण पदार्थ. वांग्यांमध्ये दाण्याचा कूट, खोबरं, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला भरुन केली जाणारी आणि तेलावर परतलेली ही लुसलुशीत वांगी चवीला इतकी छान लागतात की हा बेत अगदी आवडीने फस्त केला जातो.
3 / 7
पौष्टीकतेने भरपूर असलेली नाचणीची भाकरी शरीरासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीच्या भाकरीत प्रचंड प्रमाणात कार्बोहाड्रेडस, प्रोटीन्स, फायबर्स असतात. एवढंच नाही तर नाचणीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम, आयर्न देखील असतं. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. या बहुगुणी नाचणीपासून भाकरीऐवजी आपण विविध पदार्थ देखील बनवू शकतो.
4 / 7
कांद्याच्या फोडणीशिवाय भाजी किंवा डाळ अपूर्णच आहे. कांद्याची फोडणी देताच जेवणाची रंगत वाढते. कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नसून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन - बी, व्हिटॅमिन - सी भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. काही लोकांना जेवणासोबत कच्चा कांदा तोंडी लावायला म्हणून खायची सवय असते.
5 / 7
जांभळा कोबी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जांभळ्या कोबीचा गडद रंग त्यात असणाऱ्या उच्च अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण दर्शवतो. जांभळ्या कोबीमध्ये इतर अनेक भाज्यांच्या तुलनेने जास्त पोषक तत्वे आणि कमी कॅलरीज असतात. यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने हे खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभळा कोबी खाणे फायदेशीर ठरते.
6 / 7
कोकणात आणि दक्षिणेकडील भागात केळफुलाची भाजी हमखास केली जाते. केळफुलाची भाजी जितकी चविष्ट लागते तितकीच ती आरोग्यासाठी उत्तम असते. आजारपण आणि इनफेक्शनपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात केळफुलाच्या भाजीचा समावेश करायलाच हवा. कारण केळफुलाच्या भाजीतून तुम्हाला प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते.
7 / 7
काहीवेळा लहान मुलं तसेच आपणसुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बीटरुट शिजवून त्याचा रस काढून तो डोसा पिठात मिक्स करुन त्याचे छान पौष्टिक डोसे बनवता येऊ शकतात. यामुळे डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून लहान मुलं आवडीने खातात, असे हेल्दी आणि कलरफुल डोसे सर्वजण आवडीने खातात.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीअन्न