साबुदाण्याची खिचडी वातड - कडक होते? ५ चुका टाळा- खिचडी होईल मोकळी- मऊसुत
Updated:April 14, 2025 09:05 IST2025-04-14T09:00:00+5:302025-04-14T09:05:02+5:30
How to soak sabudana: How to soak sabudana properly for khichdi: 5 common mistakes to avoid while making sabudana khichdi: या सोप्या टिप्स लक्षात ठेवा साबुदाणा खिचडी होईल मोकळी-मऊसुत

साबुदाण्याची खिचडी आपल्या घरात उपवास किंवा सकाळच्या नाश्त्यात बनवली जाते. अनेकदा ती बनवताना साबुदाणा व्यवस्थित भिजला जरी असेल तरी खूपच कोरडी किंवा गचकी होते. (How to soak sabudan)
साबुदाण्याची खिचडी बनवताना नेमकं काय चुकत आपल्याला कळत नाही. या सोप्या टिप्स लक्षात ठेवा साबुदाणा खिचडी होईल मोकळी-मऊसुत (5common mistakes to avoid while making sabudana khichdi)
साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या, ज्यामुळे त्यात असणारा पावडर निघून जाईल. त्यानंतर साबुदाणा बुडेल इतक पाणी घालून रात्रभर किंवा ६ ते ७ तास भिजत घाला.
साबुदाणा कढईत घालण्यापूर्वी चमच्याने मोकळा करुन घ्या. ज्यामुळे त्याचा गचका होणार नाही.
साबुदाणा बनवताना तेलाऐवजी तूप घातले तर चव चांगली येते. तसेच मिरचीला फोडणी देताना ती चांगली तळून घ्या, ज्यामुळे ती बाधत नाही. त्याचा अर्क तुपात उरतो, ज्यामुळे साबुदाणा अधिक टेस्टी होतो.
बटाट्याचे पातळ काप किंवा उकडलेला बटाटा घाला. ज्यामुळे पदार्थाची चव चांगली लागते. बटाटा लवकर शॅलो फ्राय होतो.
साबुदाणा कढईत घालण्यापूर्वी तो हळूहळू घाला. सगळा एकत्र घालून नका. हलक्या हाताने तुपावर परतून घ्या.
साबुदाणा चांगला वाफवला की तो वातड किंवा कडक होत नाही. कढई किंवा खोलगट भांड्यात खिचडी बनवू नका. पॅन किंवा पसरट भांड्यात बनवा यामुळे ती लवकर शिजते.