पितृपक्ष: घरोघरच्या रीतीभाती काय सांगतात, कोणते पदार्थ खावे-कोणते टाळावे?
Updated:September 12, 2022 17:54 IST2022-09-12T17:10:22+5:302022-09-12T17:54:01+5:30
Pitru Paksha 2022 Eating Rules : पितृपंधरवाड्यात काय खावे आणि काय नाही यासंदर्भात अनेक समजूती आहेत. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या रीती दिसतात.

पितृपक्षाला सुरूवात झाली आहे. घरोघर आपल्या पुर्वजांचे स्मरण केले जाते. याकाळात सात्विक आहार अनेकजण करतात. त्यासाठी काही धार्मिक बंधनही असतात. मात्र शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नये असा नियम अनेकजण मानतात.
पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न टाळणे, त्यामागे आजार टाळणे आणि शक्यतो आपल्या कुटुंबासह ताजे अन्नच आहारात घेणे अशी भावना असू शकते.
मुळा आणि गाजर अनेकजण याकाळात खात नाहीत. पितृ पक्षात मसूर डाळीचे सेवन करू नये असेही काहीजण मानतात.
पितृ पक्षात अरबीचे सेवन निषिद्ध मानले आहे, काहीजण कारली खात नाहीत. तर त्याउलट काहीजण कारल्याचे पंचामृत प्रसाद म्हणून खातात.
काहीजण याकाळात दूध पीत नाहीत. केवळ नैवेद्याला खीर करतात.
कुठल्याही प्रकारचे मांसाहार किंवा अपेयपान याकाळात अनेकजण टाळतात.
कुठलेही पदार्थ कच्चे खाणे काही भागात योग्य मानले जात नाही. विशेषत: धान्य कच्ची खाणे टाळतात.
जीरं, काळे मीठ, काळी मोहरी, काकडी आणि वांगी हे पदार्थही खाऊ नये असं काही आख्यायिका सांगतात.