1 / 7ओणम हा केरळमधील अतिशय महत्त्वाचा सण. तेथील नववर्ष या सणापासून सुरू होते. त्यामुळे अतिशय आनंदात आणि उत्साहात तिथे ओणम साजरा केला जातो. यंदा ५ सप्टेंबरला ओणम साजरा केला जात आहे. 2 / 7यादिवशी ते घराची छान सजावट तर करतातच, पण जेवणाचा मेन्यूही खूप खास असतो. या दिवशी केरळमधील घराघरांत एवढे वेगवेगळे पदार्थ केले जातात की केळीचे पान वेगवेगळ्या चवीच्या रंगबेरंगी पक्वान्नांनी भरून जाते.3 / 7त्यापैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अवियल. यामध्ये भरपूर भाज्या वापरल्या जातात आणि त्या भाज्या नारळाच्या दुधामध्ये शिजवल्या जातात. त्यामुळे अवियलची चव अतिशय खास असते. भातासोबत अवियल खाल्ले जाते.4 / 7दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पायसम. तांदूळ, दूध, सुकामेवा घालून गोड पायसम केले जाते.5 / 7सांबार हे दाक्षिणात्य लोकांच्या रोजच्या जेवणातलाच एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यामुळे ओनमच्या दिवशीही सांबार असतेच..6 / 7नारळाची चटणीही ओणमच्या दिवशी हमखास केली जाते.7 / 7केळीचा शीरा, केळीचे चिप्स, केळीची कोशिंबीर अशा केळीच्या पदार्थांनाही या दिवशी तिथे विशेष मान असतो.