Join us

Navratri 2025: नवरात्रीसाठी खमंग उपवास भाजणी करण्याची रेसिपी, पोषण आणि स्वाद दोन्हीही भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 16:51 IST

1 / 8
नवरात्रीच्या दिवसांत अनेक जण ९ दिवसांचे उपवास करतात. घटस्थापनेपासून सुरू झालेले उपवास थेट नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी सुटतात.(how to make upvas bhajani for Navratri?)
2 / 8
त्यामुळेच या दिवसांत पोटाला आराम आणि भरपूर एनर्जी देतील असे पदार्थ खायला हवेत. अशा पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे भाजणीचे थालिपीठ.(upvas bhajani recipe for thalipith)
3 / 8
म्हणूनच आता नवरात्रीच्या उपवासासाठी घरच्याघरीच खमंग थालिपीठ भाजणी कशी करायची ते पाहूया..
4 / 8
उपवास भाजणीसाठी आपल्याला १ वाटी साबुदाणा लागणार आहे. वाटीप्रमाणे पीठाचा अंदाज दिलेला आहे. तो तुम्ही तुमच्या प्रमाणात वाढवू शकता. साबुदाणा कढईमध्ये घालून ४ ते ५ मिनिटे मध्यम आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.
5 / 8
आता कढईमधून साबुदाणा काढून घ्या आणि दिड वाटी भगर घालून ती देखील ४ ते ५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्या.
6 / 8
यानंतर १ वाटी राजगिरा घालून तो भाजून घ्यावा. राजगिरा भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवावी.
7 / 8
सगळ्यात शेवटी जिरे भाजून घ्यावे. भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर एकत्रित करून गिरणीतून दळून आणावे.
8 / 8
घरी तयार केलेल्या उपवास भाजणीची चव निश्चितच खूप वेगळी आणि खमंग लागते. एकदा नक्की ट्राय करून पाहा.
टॅग्स : नवरात्रीअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती