Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

Updated:September 22, 2025 13:51 IST2025-09-19T18:43:05+5:302025-09-22T13:51:23+5:30

Navratri 2025 Make Sabudana Vada Less Oily And Crunchy Cooking Hacks : वड्यासाठी बटाटे उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम बटाट्यामध्ये ओलावा जास्त असतो, त्यामुळे तेलात टाकल्यावर वडे जास्त तेल पितात.

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

नवरात्र (Navratri 2025) म्हटलं की उपवासाचे पदार्थ आलेच. उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही साबुदाणा, बटाटा, राजगिरा अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असाल. त्यापैकी एक म्हणजे साबुदाणा वडा. साबुदाणा वडा करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. अनेकजण साबुदाणा वडे तेलकट असतात म्हणून खाणं टाळतात. साबुदाणा वडा कमी तेलकट कसा करायचा ते पाहूया. (How To Make Sabudana Vada)

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

साबुदाणा कमी तेलकट होण्यासाठी तो योग्य प्रकारे भिजवणे सर्वात महत्त्वाचे आहे. साबुदाणा रात्रभर भिजवण्याऐवजी, तो 4-5 तास भिजवा आणि भिजवताना साबुदाणा बुडेल इतकेच पाणी घाला. यामुळे साबुदाणा जास्त मऊ होणार नाही आणि वडे तळताना तो तेल शोषून घेणार नाही. (Sabudana Vada Making 7 Tips)

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

वड्यासाठी बटाटे उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम बटाट्यामध्ये ओलावा जास्त असतो, त्यामुळे तेलात टाकल्यावर वडे जास्त तेल पितात. बटाटे थंड झाल्यावर ते किसून घ्या, यामुळे गुठळ्या राहणार नाहीत. (Sabudana Vada Making Hacks)

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

वड्याचे मिश्रण तयार करताना जाडसर वाटलेले शेंगदाणे वापरा. यामुळे वड्याला बांधणी (binding) चांगली मिळते आणि ते तळताना फुटत नाहीत. जास्त बारीक केलेले शेंगदाणे पीठ जास्त तेल शोषून घेतात.

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

साबुदाण्याचे मिश्रण मळताना ते फार सैल नसावे. तुम्ही आवश्यक वाटल्यास थोडेसे शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिऱ्याचे पीठ घालू शकता. यामुळे मिश्रण घट्ट होते आणि वडे कुरकुरीत बनतात.

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

वडे तळताना तेल योग्य तापमानाला गरम झालेले असावे. जर तेल कमी गरम असेल, तर वडे जास्त तेल पितात आणि जर ते जास्त गरम असेल, तर ते बाहेरून लवकर लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. मध्यम आचेवर वडे तळा.

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

वडे गोल किंवा जाडसर करण्याऐवजी थोडे चपटे आणि पातळ करा. यामुळे ते कमी वेळात आतपर्यंत शिजतात आणि कमी तेल शोषतात.

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

वडे तळल्यानंतर लगेचच टिशू पेपरवर ठेवा. टिशू पेपर वड्यांचे जास्तीचे तेल शोषून घेतो. हे वडे तुम्ही अप्पे पात्रातही करू शकता किंवा तव्यावरही शेलो फ्राय करू शकता. या २ पद्धतीनं कमीत कमी तेलात वडे तयार होतील.