Navratri 2025 : उपवासाला 5 मिनिटांत करा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स, बटाटा न उकडता-न वाळवता पटकन होतील
Updated:September 21, 2025 11:32 IST2025-09-21T11:09:18+5:302025-09-21T11:32:54+5:30
Navratri 2025 : कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी तेलात बटाट्याचा एक छोटा तुकडा घाला. (Potato Chips Making Tips)

नवरात्रीच्या (Navratri) दिवसांत बऱ्याच लोकांचे उपवास असतात. उपवासाच्या (Navratri Upvas) दिवसांत हलका फुलका नाश्ता म्हणून तुम्ही बटाट्याचे चिप्स खाऊ शकता. बटाट्याचे चिप्स कुरकुरीत असतात आणि छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहेत. तुम्ही घरच्याघरी बटाट्याचे चिप्स करू शकता.कमीत कमी पदार्थ वापरून मार्केटमध्ये मिळतात तसे बटाट्याचे चिप्स करू शकता. (How To Make Potato Chips at Home)
बटाटा चिप्स साठी लागणारं साहित्य
2 ते 3 मोठे बटाटे, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. (Potato Chips Making Process)
बटाट्याचे चिप्स करण्याची सोपी कृती
सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढून नंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. बटाटे चिप्सच्या साच्यानं किंवा चाकूनं पातळ गोल आकारात चिरून घ्या. काप जितके पातळ असतील तितके चिप्स कुरकुरीत बनतील.
चिरलेले बटाटे 2 ते 3 वेळा थंड पाण्यानं धुवून घ्या. यामुळे बटाट्याचे स्टार्च निघून जाईल आणि चिप्स चिकटणार नाहीत.बटाट्याचे काप एका स्वच्छ कापडावर पसरवून नंतर कोरडे करून घ्या. काप पूर्ण कोरडे असणं गरजेचं आहे. नाहीतर तळताना मऊ पडतील.
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी तेलात बटाट्याचा एक छोटा तुकडा घाला. जर तो लगेच वर आला तर तेल तळण्यासाठी तयार आहे.
बटाट्याचे काप गरम तेलात घाला. नंतर हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. चिप्स तळताना चमच्यानं ढवळत राहा.चिप्स सोनेरी झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं बाहेर काढून मग पेपरवर ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल शोषलं जाईल.
चिप्स थंड झाल्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिसळा. उपवासासाठी तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता. कुरकुरीत बटाट्याचे चिप्स खाण्यासाठी तयार आहेत.