दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

Updated:January 11, 2026 14:51 IST2026-01-11T14:38:00+5:302026-01-11T14:51:31+5:30

Makar Sankranti 2026 Shengdana Chikki Recipe :

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

दातांना न चिकटणारी शेंगदाणा चिक्की करण्यासाठी शेंगदाणे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. शेंगदाणे आतापर्यंत नीट भाजले गेले तरच चिक्की कुरकुरीत होते आणि दाताला चिकटत नाही. (Shengdana Chikki Recipe)

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

भाजल्यानंतर शेंगदाण्याची टरफलं पूर्णपणे काढून टाका आणि त्यांचे दोन भाग करून घ्या. चिक्की थापण्यापूर्वी पोळपाट आणि लाटण्याला तुपाचा हात लावून ठेवा. जेणेकरून मिश्रण चिकटणार नाही. (How To Make Perfect Shengdana chikki)

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

चिक्कीसाठी नेहमी चिक्कीचा गूळ वापरावा. गूळ चिरून घेतल्यास तो लवकर आणि एकसारखा विरघळतो.

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

गूळ विरघळताना त्यात एक चमचा साजूक तूप घाला. यामुळे चिक्कीला छान चमक येते आणि खुसखुशीत होते.

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

सर्वात महत्वाचं म्हणजे पाकाची वॉटर टेस्ट. गुळाचा पाक झाल्यावर पाण्याचे काही थेंब घेऊन त्यात पाक घाला. तो थंड झाल्यावर काचेसारखा कडक तुटला पाहिजे. जर तो खेचला जात असेल तर चिक्की दातात चिकटते.

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

पाक तयार झाल्यावर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घातल्यानं चिक्की हलकी आणि ठिसूळ बनते.

दाताला न चिकटणारी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की घरीच करा, ७ टिप्स; परफेक्ट बनेल चिक्की

पाक तयार होताच गॅस बंद करा किंवा मंद आचेवर शेंगदाणे घालून भराभर हलवा.