Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महाशिवरात्री: इंस्टंट भाजणीच्या थालिपीठाची सोपी रेसिपी, पोटाला दमदार- ॲसिडीटी, अपचन मुळीच होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 12:11 IST

1 / 6
कोणत्याही उपवासाच्या दिवशी भाजणीचं थालिपीठ खाणं हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कारण थालिपीठामुळे ॲसिटीटी, अपचन असे त्रास होत नाहीत. शिवाय ते पोटभरीचं असल्याने वारंवार भूकही लागत नाही.
2 / 6
म्हणूनच महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर भाजणीचं थालिपीठ खाण्यास प्राधान्य द्या. घरात भाजणी तयार नसेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही उपवासासाठी इंस्टंट भाजणी तयार करू शकता.(mahashivratri special upvas bhajani thalipith)
3 / 6
यासाठी सगळ्यात आधी १ वाटी साबुदाणा गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर १ वाटी राजगिराही भाजून घ्या. हे सगळे पदार्थ भाजत असताना गॅस मंद ठेवावा. (how to make instant bhajani for mahashivratri upvas?)
4 / 6
नंतर १ वाटी भगर घालून ती देखील मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या. तुमचं इंस्टंट भाजणी पीठ तयार.
5 / 6
आता हे पीठ एका भांड्यात काढा. त्यामध्ये उकडलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून टाका. त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्यांची पेस्ट, २ ते ३ चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, हवं असेल तर लाल तिखट असं सगळं साहित्य घालून थोडंसं दही घालून पीठ मळून घ्या.
6 / 6
आता तव्याला थोडंसं तूप लावून या पिठाचे थापून खमंग थालिपीठ तयार करा..
टॅग्स : अन्नमहाशिवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४