कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

Updated:March 17, 2026 18:00 IST2026-03-17T18:00:00+5:302026-03-17T18:00:02+5:30

How to cut watermelon in Marathi: Kalingadachya biya kashya kadhyachya: पाहूया कलिंगडच्या बिया काढण्याची सोपी ट्रिक

कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

उन्हाळ्याच्या सुट्टीत कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. थंडगार, रसाळ आणि लालेलाल कलिंगड कुणाला खायला आवडत नाही. पण कलिंगड खाताना सर्वात मोठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे त्यातील बिया. प्रत्येक फोडीमध्ये येणाऱ्या बिया या कलिंगड खाण्याचा आस्वाद कमी करतात. पण जपानमध्ये कलिंगड कापण्याची अशी स्मार्ट पद्धत वापरली जाते, ज्यामुळे बिया न टोचता आपण फळाचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतो. (How to cut watermelon in Marathi)

कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

कलिंगडच्या बिया या आत कशाही पसरलेल्या नसतात, त्या एका विशिष्ट पॅटर्नमध्ये असतात. जर आपण व्यवस्थित कलिंगड कापले तर त्या बिया सहज बाहेर काढता येतात. पाहूया कलिंगडच्या बिया काढण्याची सोपी ट्रिक. (Kalingadachya biya kashya kadhyachya)

कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

सर्वात आधी कलिंगड आडवे ठेवून त्याचे मधोमध दोन समान गोल भाग करा. यामुळे आपल्याला कलिंगडच्या आतील भागाचा क्रॉस सेक्शन स्पष्ट दिसेल.

कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

कापलेल्या भागाकडे नीट पाहिल्यास समजेल. मध्यभागापासून बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या साधारण ३ किंवा ६ गडद रंगाच्या रेषा दिसतील. या रेषांच्या बाजूलाच कलिंगडच्या सर्व बिया एका रांगेत असतील.

कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

आता सुरीच्या मदतीने कलिंगडच्या फोडी करा. जपानी पद्धतीनुसार जेव्हा आपण रेषेवर बरोबर काप देता, तेव्हा सर्व बिया फोडीच्या अगदी वरच्या बाजूला किंवा कडेला येतात.

कलिंगड कापण्याची जपानी ट्रिक! बिया येतील सहज बाहेर, लालेलाल रसाळ फोडी सहज हातात

या पद्धतीने बिया कलिंगडच्या गरामध्ये लपून न राहता पृष्ठभागावर येतात. नंतर चमच्याने किंवा सुरीच्या मदतीने सर्व बिया बाहेर काढा. यानंतर आपण बिया नसलेलं , स्वच्छ आणि लालेलाल दिसणारी कलिंगडची फोड खाऊ शकतो.