1 / 10पूर्वीच्या काळी अन्नाचा संबंध माणसाच्या खिशाशी जोडला जायचा. ज्याच्या घरात गहू-तांदूळ असायचे तो श्रीमंत व्यक्ती आणि ज्याच्या ताटात बाजरीची भाकरी, नाचणीची आंबील किंवा सत्तूचे पीठ असायचे, त्याला 'गरिबांचा आहार' म्हणून हिणवले जायचे. पण म्हणतात ना, काळाचे चक्र फिरते आणि तसेच काहीसे या पारंपरिक भारतीय पदार्थांच्या बाबतीत घडले आहे.(poor man’s food)2 / 10एकेकाळी गरिबांचे अन्न म्हणून हिणवले जाणारे पदार्थ आज फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळताय. पाहूया या ७ पदार्थांबद्दल..(traditional Indian food)3 / 10गव्हाच्या ग्लूटेनमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी अनेकजण मल्टीग्रेन किंवा मिलेट्सकडे वळले आहेत. फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये रागी डोसा किंवा बाजरीची भाकरी, खिचडी महागड्या दरात मिळते. 4 / 10बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात मिळणारा लिट्टी चोखा हा घराघरात खाल्ला जातो. पण सध्या हा पदार्थ पर्यटकप्रेमींना प्रचंड प्रमाणात आवडतो. आज राजस्थान आणि मध्य प्रदेशातील हेच पारंपरिक जेवण मोठ्या शाही विवाह सोहळ्यांचे मुख्य आकर्षण असते.5 / 10दाल मखानी ही एकेकाळी पंजाबमधील शेतकरी किंवा मजुरांचे जेवण होते. पण सध्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेन्यूमध्ये सर्वात महागडी आणि रॉयल समजली जाते. 6 / 10आजारी माणसाचे किंवा गरिबांचे अन्न म्हणून ओळखली जाणारी खिचडी. आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेन्यू कार्डवर स्थिरावली आहे. अनेकजण हा पदार्थ वन पॉट मील म्हणून खातात. 7 / 10कर्नाटक आणि दक्षिण भारताच्या ग्रामीण भागात रागी मुड्डे हे शेतकरी किंवा मजुरांचे मुख्य अन्न असायचे. पण सध्या हे मधुमेह आणि श्रीमंत लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग झाले आहेत. 8 / 10पंजाबमध्ये सरसों चे साग आणि मक्याची चपाती कायम खाल्ली जाते. आता हा पदार्थ महागड्या हॉटेल्समध्ये मेन्यू कार्डवर पाहायला मिळतो. 9 / 10ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील घराघरात खाल्ला जाणारा पखाला भात हा गरिबांचे जेवण म्हणून ओखळला जायचा. पण आता या डिशला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. 10 / 10पूर्वी नाशिक, कोल्हापूर आणि खान्देशातील ग्रामीण भागात मिसळ हा पदार्थ घरोघरी बनवला जात असे. आता हा पदार्थ जागतिक स्तरावर बेस्ट स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो.