नारळ फोडलं की २ दिवसांत खोबऱ्याला आंबूस वास येतो, बुरशी लागते? ५ ट्रिक्स-ओलं खोबरेल टिकेल महिनाभर
Updated:January 12, 2026 15:30 IST2025-01-12T17:00:00+5:302026-01-12T15:30:02+5:30
cut coconut storage: how to store cut coconut: coconut going bad: महिनाभर नारळ फ्रेश राहण्यासाठी काय करावं?

पूजा, स्वयंपाक किंवा एखाद्या खास प्रसंगी नारळाचा वापर केला जातो. नारळ फोडल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे तो लवकर खराब होणं. नारळ फोडला की १ ते २ दिवसातचं त्याला आंबूस वास येऊ लागतो, चव बदलते. ज्यामुळे तो फेकून द्यावा लागतो. (cut coconut storage)
रोज नवीन नारळ विकत घेणं आपल्याला शक्य होत नाही. अशावेळी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर महिनाभर नारळ फ्रेश राहिल, तसेच त्याची चव देखील टिकून राहते. (how to store cut coconut)
नारळ लवकर खराब होण्याचे कारण म्हणजे यात असणारं पाणी. जेव्हा फोडलेला नारळ हा हवेच्या संपर्कात आल्याने त्याला लवकर बुरशी लागते, ज्यामुळे त्याचा वास येऊ लागतो. अनेकजण नारळाला पाण्यात ठेवतात, ज्यामुळे तो चिकट होतो.
फोडलेल्या नारळाला अधिक वेळ फ्रेश ठेवण्यासाठी आपण त्याला हवेच्या संपर्कात ठेवू नका. नारळाच्या तुकड्यांना टाइट कंटेनरमध्ये ठेवा. ज्यामुळे हवा आत येणार नाही. यामुळे नारळ फ्रेश राहिल आणि बुरशीही लागणार नाही.
फोडलेल्या नारळाऐवजी आपण किसलेला नारळ अधिक काळ स्टोर करु शकतो. किसलेला नारळ साफ करुन त्याला थोडे सुकवून घ्या. नंतर एअरटाइट कंटेनरमध्ये बंद करुन फ्रीजमध्ये ठेवा.
फोडलेला नारळ साठवण्यासाठी गरम न केलेलं नारळाचे तेल लावून स्टोर करा. यामुळे त्याला बुरशी लागणार नाही.
फोडलेला नारळ स्टोर करण्यासाठी आपण त्याच्या वरच्या भागावर मीठ देखील लावू शकतो. मीठात नॅचरल एंटी-माइक्रोबियल असतात. जे फंगस आणि दुर्गंधी दोघांनाही रोखू शकतात.
नारळ ज्या ठिकाणी साठवणार असाल तो डबा साफ असायला हवा. डब्यात पाणी असेल तर नारळ लवकर खराब होईल.