बेसन कच्चं राहातं- लाडू टाळूला चिकटतो? बेसन भाजण्यासाठी ५ टिप्स - लाडू होईल रवाळ- दाणेदार
Updated:August 24, 2025 17:07 IST2025-08-24T17:02:45+5:302025-08-24T17:07:13+5:30
how to roast besan : besan ladoo recipe: tips for making perfect ladoo : आपल्यालाही परफेक्ट बेसनाचे लाडू बनवायचे असतील तर या खास टिप्स फॉलो करा.

गणेशोत्सवात आपण विविध पदार्थांची चव चाखतो. लाडक्या बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांची रेलचेल घरात असते. उकडीचे मोदक, बुंदीचा लाडू, बेसनाचे लाडू, पुरणपोळी अशा विविध पदार्थांचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवतो. पण मोदक नंतर बाप्पाला अतिप्रिय असणारा पदार्थ बेसन लाडू. (how to roast besan )
अनेकदा बेसनाचा लाडू करताना तो फसतो. बेसन व्यवस्थित भाजले गेले नाही तर टाळूला चिकटते- कच्चे लागते. काही बेसिक लहान-सहान चुकांमुळे लाडूची चव बिघडते. त्यामुळे आपला देखील हिरमोड होतो. जर आपल्यालाही परफेक्ट बेसनाचे लाडू बनवायचे असतील तर या खास टिप्स फॉलो करा. (besan ladoo recipe)
बेसनाच्या पिठात गुठळ्या राहू नये म्हणून बेसन सतत चमच्याने भाजत राहा. यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाही.
लाडू खाताना बेसन टाळूला चिकटत असेल तर पीठ व्यवस्थित भाजले गेले नाही असं समजावं. मंद आचेवर बेसनाचे पीठ सारखे ढवळत राहा. लालसर रंग आल्यानंतर बेसन व्यवस्थित भाजले गेले आहे. तसेच पीठाचा सुगंध देखील येतो.
बेसनाचे पीठ गरम असेल तर त्यात लगेच साखर, तूप किंवा पाक घालू नका. यामुळे जिन्नस लवकर वितळते ज्यामुळे मिश्रण पातळ होते आणि लाडू व्यवस्थित वळवता येत नाहीत. बेसनाचे पीठ थोडे थंड झाल्यानंतर त्यात साखर, तूप किंवा पाक घालावा.
लाडूला पिवळा रंग हवा असेल तर बेसन पीठ चांगले भाजून घ्या. गॅस बंद केल्यानंतर देखील पीठ चमच्याने ढवळत राहा. कढई गरम असल्यामुळे पीठ भांड्याला चिकटते, ज्यामुळे ते करपून त्याचा वास येऊ लागतो.
लाडू वळताना पीठ थोडे फार गरम असायला हवे. ज्यामुळे ते पटकन वळवता येतात. तसेच त्याचा आकार देखील एकसारखा येतो. लाडू नीट वळवता येत नसतील तर मिश्रणात थोडं तूप गरम करुन नीट मिसळा, ते सहज बांधले जातील.
लाडू कडक होऊ नये म्हणून बेसन पिठात पाक मिसळताना पीठ एकदम थंड किंवा गरम नसावे. साधारणत: मध्यम गरम असल्यास जिन्नस घालून वळल्यास ते कडक होत नाहीत.
बेसनाचे पीठ कधीही मोठ्या आचेवर भाजू नका. असं केल्याने काही भागात बेसन जास्त भाजले जाते तर काही ठिकाणी कमी भाजले जाते. यामुळे ते कच्चे राहण्याची अधिक शक्यता असते.