चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

Updated:September 28, 2025 17:40 IST2025-09-28T16:53:47+5:302025-09-28T17:40:28+5:30

How To Maker Soft Chapati : पीठ मळताना फक्त पाणी न वापरता त्यात तेल किंवा तुपाचा वापर करा.

चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

चपात्या प्रत्येक घरांत नेहमी केला जाणारा पदार्थ असला तरी परफेक्ट चपात्या करणं सर्वांनाच जमतं असं नाही. चपात्या कधी वातड होतात कधी फुगतच नाही असं अनेक घरांत होतं. परफेक्ट चपात्या करण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (How To Maker Soft Chapati)

चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

चपातीचं पीठ मऊ आणि लवचीक होण्याासठी गव्हाची गुणवत्ता तपासणंसुद्धा महत्वाचं असतं. म्हणूनच भेसळयुक्त गव्हाचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. चांगल्या प्रतीचे गहू चपातीसाठी निवडा. (Use 5 tricks while kneading the dough, chapatis will remain soft for 48 hours)

चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

पीठ मळताना फक्त पाणी न वापरता त्यात तेल किंवा तुपाचा वापर करा. यामुळे कोणतंही नुकसान होत नाही पण चपात्या फुगतात. तूप किंवा मोहोरीच्या तेलाचे काही थेंब वापरून तुम्ही चपातीची चव वाढवू शकता. ज्यामुळे चपात्या दीर्घकाळ मऊ राहतात.

चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

चपातीचं पीठ मऊ राहण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू नका. शक्यतो कोमट पाण्यानं पीठ मळा. थंड पाण्यामुळे चपाती मऊ होत नाही आणि चपाती लाटायलाही त्रास होतो. म्हणून चपातीचं पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

पीठ मळताना सर्व पीठ एकत्र घालू नका. हळूहळू घाला. हलक्या हातानं पीठ मळा. पीठ जितकं लवचीक असेल तितकंच ते सॉफ्ट होईल.

चपात्या वातड होतात-मऊपणा जातो? कणीक मळताना ५ ट्रिक्स वापरा, ४८ तास मऊ राहतील चपात्या

चपातीचं पीठ कमीत कमी ५ ते १० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पिठातील पाणी आणि ग्लुटेन पूर्णपणे शोषून घेता येतं आणि पीठ पूर्णपणे सॉफ्ट होतं.