ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

Updated:September 11, 2025 18:30 IST2025-09-11T18:30:00+5:302025-09-11T18:30:02+5:30

dhokla tips: soft spongy dhokla: dhokla recipe tricks: काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास ढोकळा एकदम परफेक्ट बनेल.

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

आपल्यापैकी अनेकांच्या घरात सकाळच्या नाश्त्यात ढोकळा खाल्ला जातो. परंतु, अनेकदा विकतच्या ढोकळ्यापेक्षा घरी बनवण्याची इच्छा होते. ढोकळा हा हलका, चवदार आणि पचायला चांगला असणारा पदार्थ. (soft spongy dhokla)

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

पण घरी बनवताना अनेकदा ढोकळा बनवताना तो व्यवस्थित फुगत नाही, कडक होतो किंवा गिळताना घशात अडकतो. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास ढोकळा एकदम परफेक्ट बनेल. (dhokla recipe tricks)

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

सगळ्यात आधी ढोकळ्याचे पीठ योग्य प्रमाणात आंबलेले असणे महत्त्वाचे आहे. पीठ फार घट्ट असेल तर ढोकळा दाटसर आणि कोरडा होतो, ज्यामुळे तो गिळताना अडकतो.

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

पीठ तयार करताना थोडंसं जास्त पाणी घालून त्याला थोडी सैलसर कन्सिस्टन्सी होईल. त्यात मीठ- सोडा घालून पुन्हा एकदा हलवून बॅटर वाफवण्यास ठेवा. यामुळे पीठात हवा मिसळली जाते आणि ढोकळा अगदी स्पाँजी आणि हलका होतो.

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

वाफवताना साधरण १५ ते २० मिनिटं मध्यम आचेवर वाफवला तर ढोकळा मऊ आणि स्पाँजी होतो. वाफवल्यानंतर लगेच कापू नका, थोडं थंड होऊ द्या म्हणजे तुटणार नाही आणि व्यवस्थित होईल.

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

तडका देताना तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून त्यावर पाणी-साखरेचा सिरप घालावा. हा सिरप ढोकळ्यात छान ओलावा तयार करतो आणि त्याची चवही दुप्पट करतो.

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

सिरपमुळे ढोकळा अगदी ओलसर आणि मऊ होतो, गिळताना त्रास होत नाही.

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

पीठाची कन्सिस्टन्सी, एनोचे योग्य प्रमाण, आणि वाफवण्याची वेळ हे तीन महत्वाचे घटक आहेत. हे लक्षात ठेवले तर ढोकळा नेहमी परफेक्ट बनेल, स्पाँजी आणि हलका होईल.