केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

Updated:September 8, 2025 19:00 IST2025-09-08T19:00:00+5:302025-09-08T19:00:02+5:30

banana chips recipe: crispy banana chips: homemade banana wafers : काही सोप्या टिप्स वापरल्या तर केळीचे वेफर्स अगदी कुरकुरीत होतील.

केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

बाजारात मिळणाऱ्या वेफर्समध्ये जास्त प्रमाणात तेल, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. पण घरच्या घरी केले जाणारे केळीचे वेफर्स मात्र चविष्ट, ताजे आणि हवे तसे मसाले घालून तयार करता येतात.(banana chips recipe)

केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

अनेकदा घरी केळीचे वेफर्स करताना ते कुरकुरीत होत नाही. पटकन मऊ होतात किंवा जास्त प्रमाणात तेल शोषून घेतले जाते. ज्यामुळे चविष्ट होत नाही. पण काही सोप्या टिप्स वापरल्या तर वेफर्स अगदी कुरकुरीत होतील. (crispy banana chips)

केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

सगळ्यात आधी केळी ही कच्ची असायला हवी. पिकलेल्या केळीचे वेफर्स होत नाहीत. त्यानंतर केळी सोलून त्याचे पातळ गोल काप करा. चिप्स कटर वापरल्यावर एकसारखे काप होतील.

केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

कापलेली केळी हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे रंग आणि चव वाढते. नंतर हे कोरड्या कापडावर पसरवून त्यातील अतिरिक्त ओलेपणा काढून घ्या.

केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

तळताना तेल मध्यम आचेवर गरम करा. केळीचे काप एकेक करुन तेलात सोडा, सोनेरी रंग होईपर्यंत तळा. तळलेले वेफर्स टिशू पेपरवर ठेवून अतिरिक्त तेल शोषून घेईल.

केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील

वेफर्स पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे किमान एक आठवडा तरी फ्रेश राहतील.