द्राक्षं गोड की आंबट? ताजी गोड द्राक्षं ओळखण्याची पाहा सोपी युक्ती - न खाता निवडा योग्य फळ...
Updated:March 21, 2026 12:56 IST2026-03-20T20:20:22+5:302026-03-21T12:56:28+5:30
how to identify sweet & juicy grapes : how to know grapes are sweet : how to identify sweet grapes : द्राक्ष विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? फक्त आकार आणि रंगावरून ओळखा गोडी...

how to identify sweet & juicy grapes
उन्हाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती रसाळ, आंबट - गोड, गोलमटोल टपोरी द्राक्ष...कडक उन्हाच्या झळा लागत असताना, थंडगार द्राक्षांचा एक घड हाताशी असणं म्हणजे मोठे सुखच... प्रत्येक घराघरात या सिझनमध्ये द्राक्ष हमखास विकत आणली जातात, कारण ती केवळ चविष्टच नाहीत तर शरीराला थंडावा देणारी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात(how to identify sweet grapes).
how to know grapes are sweet
पण, अनेकदा असं होतं की, दिसायला सुंदर असणारी द्राक्ष घरी आणून खाल्ली की ती आंबट निघतात आणि सगळा मूड ऑफ होतो आणि पैसेही वाया जातात...मग नेमकी गोड आणि रसाळ द्राक्षे कशी ओळखायची? द्राक्ष विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पाहूयात काही सोप्या पण फायदेशीर टिप्स, ज्यामुळे तुम्ही नेहमीच गोड आणि टेस्टी द्राक्षं निवडू शकाल...
१. रंगाकडे लक्ष द्या :-
द्राक्षांचा रंग त्यांची गोडी सांगतो. हिरवी द्राक्ष पूर्णपणे गोड होण्यासाठी त्यांचा रंग फिकट पिवळसर किंवा सोनेरी-हिरवा असावा. जर ती गडद हिरवी असतील, तर ती कच्ची आणि आंबट असण्याची शक्यता जास्त असते. काळी किंवा लाल द्राक्ष निवडताना, त्यांचा रंग गडद आणि गडद असावा.
२. द्राक्षांचा आकार :-
द्राक्ष विकत घेताना केवळ त्यांचा रंगच नाही, तर त्यांचा आकार देखील त्यांची चव सांगत असतो. गोल आणि थोडे मऊ असणारी द्राक्ष चवीला अत्यंत गोड असतात. याउलट, लांबट आकाराची द्राक्ष तुलनेने कमी गोड किंवा थोडी आंबट असू शकतात. त्यामुळे नेहमी गोल आणि टपोरी द्राक्ष विकत घ्यावी. द्राक्ष शक्यतो एकसमान आकाराची असावीत. खूप लहान आणि खूप मोठ्या द्राक्षांच्या मिश्रणापेक्षा, मध्यम आणि समान आकाराची द्राक्ष गोड असण्याची शक्यता जास्त असते.
३. द्राक्षांचा सुवास आणि देठ :-
द्राक्ष विकत घेताना केवळ त्याच्या आकारावर नाही, तर त्यांच्या वासावर आणि देठावर देखील लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. द्राक्ष गोड आहेत की नाही हे तुम्ही त्यांचा वास घेऊनही ओळखू शकता. जर द्राक्ष नैसर्गिकरित्या गोड असतील, तर त्यातून एक अतिशय सौम्य आणि गोडसर सुवास येतो. याउलट, ज्या द्राक्षांचा वास काहीसा विचित्र किंवा उग्र येतो, ती द्राक्ष बहुधा आंबट किंवा खराब झालेली असू शकतात. द्राक्षांच्या घडाचा देठ त्यांचा ताजेपणा सांगतो. जर द्राक्षांच्या घडाचा देठ हिरवागार आणि ताजा दिसत असेल, तर समजावे की द्राक्ष एकदम फ्रेश आहेत. मात्र, जर तुम्हाला देठ तपकिरी रंगाचा किंवा वाळलेला दिसत असेल, तर ही द्राक्ष जुनी झाली आहेत आणि त्यांची चवही उतरलेली असू शकते.
४. घडाची रचना :-
खूप दाटीवाटीने असलेली द्राक्ष न निवडता, ज्या घडात द्राक्ष थोड्या मोकळ्या हवेत आणि समान आकाराची आहेत, असा घड निवडा. अशा द्राक्षांना सूर्यप्रकाश आणि हवा चांगली मिळालेली असते, त्यामुळे ती गोड असतात. घड हातात घेतल्यावर द्राक्ष दांड्याला घट्ट चिकटलेली असावीत. जर घड हलवल्यावर द्राक्ष लगेच गळून पडत असतील, तर ती द्राक्ष खूप जुनी आहेत आणि त्यांची गोडी कमी झालेली असते.
५. पांढरा थर :-
द्राक्षांवर अनेकदा नैसर्गिक पांढरा, पावडरसारखा थर दिसतो. हा थर द्राक्षांना ताजे ठेवण्यास मदत करतो. असा थर असलेली द्राक्ष अधिक ताजी आणि रसायन न वापरता नैसर्गिकरित्या पिकवलेली असतात.
६. खराब झालेली द्राक्ष काढा :-
घड निवडताना त्यावर खराब, पिचलेली किंवा बुरशी आलेली द्राक्ष नाहीत ना, याची खात्री करा. एक जरी खराब द्राक्ष असेल तर ते संपूर्ण घडाची चव बिघडू शकते.
७. द्राक्षांच्या दाण्यांचा घट्टपणा तपासा :-
द्राक्षं घट्ट आणि टणक असावीत, मऊ किंवा सुरकुतलेली द्राक्षं विकत घेणं टाळा.